डॉ. प्रभुदेसाई यांच्या जरामरणचे प्रकाशन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
rat13p8.jpg
49801
रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनी डॉ. प्रभुदेसाई लिखित जरामरण पुस्तकाचे प्रकाशन करताना माधव अंकलगे. डावीकडून राहुल कुलकर्णी, प्रकाश दळवी, अरुण नेरूरकर, गजानन पाटील आणि डॉ. शरद प्रभुदेसाई.
डॉ. प्रभुदेसाई यांच्या जरामरणचे प्रकाशन
रत्नागिरी, ता. १३ : ग्रामीण भागातील तरूण, कष्टकरी शेतकरी कधीच आपल्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडत नाही. एकाही शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात दिसणार नाही, हे डॉ. शरद प्रभुदेसाई यांनी केलेले निरीक्षण अचूक आहे. लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा त्याच्याभोवतालची स्थिती सृजनशील रितीने मांडतो. आपणही म्हातारे होणार आहोत, हातात काठी येणार आहे, चष्मा लागणार असल्याचे तरूण पिढी विसरत चालली आहे. त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. आई-वडिल हेच श्रेष्ठ आहेत, हे कळल्यानंतरच समाजात वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन कोमसापचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.
जनसेवा ग्रंथालय आयोजित आणि बालरोगतज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई लिखित ‘जरामरण’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. जनसेवा ग्रंथालयाच्या ३४ व्या वर्धापन दिनी राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसापचे सल्लागार अरुण नेरूरकर, जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुळकर्णी आदी उपस्थित होते.
भाग्यश्री पटवर्धन यांनी जरामरण पुस्तकाचा परिचय करून दिला. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी अभिप्राय वाचन केले.
लेखक डॉ. प्रभुदेसाई यांनी आपले मनोगतात सांगितले की, माझ्या वडिलांमुळे मी जरामरण हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झालो. वृध्दत्वावरिल लेखन वाचताना मला इंग्रजी साहित्य हाती लागले. ते वाचताना असे लक्षात आले की, परदेशातील वृध्द आणि भारतीय वृध्द यांच्या समस्या, जीवनमानात फरक आहे. त्यामुळे पुस्तक अनुवादित न करता भारतीय वृध्दांच्या समस्या जाणून घेऊन स्वतंत्र लेखन सुरू केले. वृध्दत्व आणि मरण या दोन जवळच्या अवस्था आहेत, त्यामुळेच पुस्तकाला जरामरण हे नाव दिले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares