रत्नागिरी-भोकेतील शेतकऱ्यांचा पीकविम्याचा प्रश्न मार्गी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
भोकेतील शेतकऱ्यांचा
पीकविम्याचा प्रश्न मार्गी
रत्नागिरी, ता. १२ ः उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने अखेर तालुक्यातील भोके, आंबेकरवाडी या महसूल गावातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या करबुडे शाखेतून पिककर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पिकविमा जमा करण्याचे बॅंक अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बागायतदारांनी केला.
पिकविम्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या आवाहनानुसार आज भोकेतील शेतकरी सामंत यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंकुष धामणस्कर, फैय्याज मुकादम यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व रिलायन्स विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी सर्व बागायतदारांची यशस्वी चर्चा घडवून आणली.
कृषी अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी सप्टेंबरअखेरपर्यंत भोके व आंबेकरवाडी महसूल गावातील शेतकऱ्यांचा पिकविमा त्यांचे कर्ज खात्यात जमा करण्याचे मान्य केले. भोके गावचे सरपंच श्रीपत मायंगडे, मंगेश जाधव, राजाराम मायंगडे, राजेंद्र आंबेकर, संजय आंबेकर, अनिल रेवाळे, विजय आंबेकर, सुरेश मायंगडे, शैलेश आंबेकर, सुरेश लिंगायत, दिलीप मायंगडे, दिशा आंबेकर, दिनकर मायंगडे उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares