शेतकऱ्याला जिवंतपणीच मदत करा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
घोडेगाव, ता. १३ : आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जिवंतपणी व वेळेवर मदत करा. या मागणीसाठी आंबेगाव तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदार रमा जोशी यांना लेखी निवेदन देण्यात आले.
दोन महिने कोणत्याही मालाला बाजारभाव शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आंबेगाव तालुक्यात सध्या विविध भागात दररोज ढगफुटीसदृश्य पाऊस पडत असून, त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित नुकसानीची पाहणी व पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस मदत द्यावी. तसेच घोडेगाव ग्रामपंचायतीसह इतरही ग्रामपंचायती घनकचरा घोडनदीपात्रात टाकत आहे. त्यामुळे हा सर्व घनकचरा पाण्याबरोबर वाहत जात आहे. संबंधित पाणी नदीकाठची गावे पिण्यासाठी वापरत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत टाकत असलेल्या घनकचऱ्यावर बंदी घालून ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक अॅड. अविनाश रहाणे, राजाराम बाणेखेले, उपजिल्हा प्रमुख गोविंद काळे, तालुकाप्रमुख दिलीप पवळे, तालुका युवती अधिकारी डॉ. निलम गावडे, राजेंद्र सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बो-हाडे, अमोल काळे, अजित मोरडे, विनोद घुले, दिलीप चासकर, प्रताप काळे, संजय तोडकर, भावेश रागमहाले, अक्षय कुलकर्णी, रवींद्र तोत्रे, संजय कोकणे, विशाल तोत्रे, बबन तोत्रे, अनिल तोत्रे, ओंकार काळे, कार्तिक काळे आदि मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी शेती पिकांची ई -पीक पाहणी त्वरित करून घ्यावी, अन्यथा नुकसान भरपाई मिळण्याबाबत व पी. एम .किसान लाभ मिळण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी तत्काळ करावी. संबंधित लाभापासून शेतकरी वंचित राहिल्यास त्यास संबंधित शेतकरी जबाबदार राहील.
– रमा जोशी, तहसीलदार, आंबेगाव तालुका.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares