Marathi News Live Update : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन – TV9 Marathi

Written by

| Edited By: वनिता कांबळे
Sep 13, 2022 | 11:16 PM
दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्थेचं भान ठेऊन वागावं’ अशी सूचना सरवणकर प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी यांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदे गटातील आमदारांकडून भगवी शाल आणि रुद्राक्षांची माळ देण्यात आली.

सातारा: श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे ते चुलते आहेत.  पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर उद्या गुरुवारीअंत्यसंस्कार  होणार आहेत. 1985 ते1991 दरम्यान ते सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.  साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनाचे शिल्पकार ते आहेत.
मुंबई : शिंदे गटाचा दसरा मेळावा BKC मैदानावर होणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत दसरा मेळावा BKC मैदानावर घेण्याचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केला होता. पण कायदा सुव्यवस्थेचा विचार करता हा मेळावा  BKC मैदानावर घेण्याचा निर्णय झाला आहे.
राज्यात लम्पी आजाराचा धोका वाढला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. लम्पी आजाराचा धोका लक्षात घेता  बैलगाडा शर्य़तींवर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.  लम्पी आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी ही बंदी घालण्यात यावी.  बैलगाडा शर्यंतींमुळे मोठ्या प्रामणात बैल एकत्र येतात. यामुळे शर्यतींच्या आयोजनामुळे लम्पी आजार वाढण्चीया शक्यता पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मविआ’ने महाराष्ट्रात आणलेला 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरुन युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.  वेदांतचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेला त्यावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
पब्जी गेमच्या नादात कोल्हापुरातील तरुणाने आत्महत्या केली आहे.  हर्षद डकरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षद हा करवीर तालुक्यातील घानवडे गावचा तरुण आहे. पब्जी खेळण्यावरून घरात वारंवार वाद होत होते.  हर्षदने विषप्राशन केल्याचे कळताच त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान हर्षद याचा मृत्यू झाला.
पुणे, थेऊर
-थेऊर येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त देवस्थानच्यावतीने महापूजा
-राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गणेश भक्तांनी आज अंगारकी चतुर्थीच औचित्य साधून चिंतामणीचं घेतलं दर्शन
-आलेल्या भाविकांना ट्रस्ट मार्फत उपवासाची खिचडी, केळी वाटप
राज्यातील विविध वकिलांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
शिवसेनेसोबत कार्यरत होण्याची इच्छा केली व्यक्त
अनेक वकिलांनी साधला संवाद
विविध विषयावर झाली चर्चा
परभणी
परभणीत लंपी आजार नियंत्रणात ,
सर्व उपाय योजना राबवत असल्याची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची माहिती
जिल्ह्यात आजवर 17 पशूंना लंपीची लागण झाल्याची नोंद
पशूंवर उपचार करण्यात आले  17 त्यापैकी 15 पशु बरेही झाले.
लागण झालेल्या परिसरातील 5 किलोमीटर पर्यंतच्या सर्व पशूंना लसी
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व जनावरांचे बाजार बंद केले,
तर पशूंच्या वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आले
उल्हासनगरात शिवसैनिकांची पोलीस ठाण्यावर धडक
“युवासेना शहरप्रमुखावर खोट्या गुन्ह्याचं षडयंत्र!”
जुन्या गुन्ह्यातील बॉण्ड रद्द करण्याची दिली नोटीस
खासदार कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यात दिला होता बॉण्ड
शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या वादातून घडलेला प्रकार
“तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्याचे आम्ही हेडमास्तर!”
शिवसेना शहरप्रमुखांचा पोलिसांना उग्र आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर
पब्जी गेमच्या नादात कोल्हापुरातील तरुणाची आत्महत्या
हर्षद डकरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव
हर्षद हा करवीर तालुक्यातील घानवडे गावचा तरुण
पब्जी खेळण्यावरून घरात वारंवार वाद होत होते
हर्षदने विषप्राशन केल्याचे कळताच रुग्णालयात दाखल केले
रुग्णालयात उपचारादरम्यान हर्षदचा मृत्यू
भंडारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक निलंबित.
भंडारा पोलीस अधीक्षकांची कारवाई
सचिन सूर्यवंशी निलंबित उपनिरीक्षकाचे नाव
कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत प्रोजेक्ट गुजरातला वळाला – आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही
पिस्तुल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या; आदित्य ठाकरेंनी सुनावलं
महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत प्रोजेक्टने आपला मोर्चा गुजरातला वळवला आहे.
राज्यातील खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच वेदांत प्रोजेक्ट गुजरातला वळाला असं स्पष्ट होतं.
युवासेना प्रमुख माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांची टीका
हिंगोली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहले रक्ताने पत्र
सेनगाव तालुक्यातील अतिवृष्टीतून तीन मंडळे वगळ्याल्याने लिहले रक्ताने पत्र
सेनगाव तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले पत्र,
पत्रात नुकसानभरपाई देण्याची केली मागणी
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव पतंगेंनी लिहले पत्र
भंडारा ब्रेकींग
ओला दुष्काळ जाहीर करा भंडाऱ्यातील शेतकऱ्यांची मागणी
अतिवृष्टी आता करपा आणि खोडकिडीचा वार
जिल्ह्यातील शेतकरी बेजार
ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
अमरावती
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्याशी घातलेल्या हुज्जतीचे प्रकरण
सामाजिक संघटना ,पोलीस कर्मचारी पत्नी, निवृत्त पोलीस अधिकारी संघटना यांची करवाईची मागणी
गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही विधीतज्ज्ञांशी सल्ला घेत आहेत
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांची tv9 ला माहिती….
पुणे
वानवडी पाठोपाठ कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर एफडीएची कारवाई
कोंढवा बुद्रुक येथील टिळकरनगर परिसरातील सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई
22 लाख 65 हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त
5 सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई
साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत किंमत 2 लाख 39 हजार 800 रूपये किंमतीचे 1 हजार 199 किलो पनीर 18 लाख 71 हजार 652 रूपये किंमतीचे 4 हजार 73 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 1 लाख 53 हजार 675 रूपये किंमतीचे 1 हजार 48 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 22 लाख 65 हजार 217 रुपये किंमतीचा साठा जप्त
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट
मथुरा-श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला
सुनावणीदरम्यान सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड हजर नव्हता
या फेरविचार याचिकेवर जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती
याचिकाकर्ते महेंद्र प्रताप सिंग यांनी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला अर्ज सादर करण्याचा आदेश
परभणी
स्वाभिमानी प्रमुख राजू शेट्टी यांचा परभणीत ट्रॅक्टर मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज परभणीत ट्रॅक्टर मोर्चा
संत तुकाराम महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात मोठ्याप्रमाणात शेतकरी
ट्रॅक्टर  घेऊन झाले सहभागी
राजू शेट्टी यांचा सरकार-विरोधकांवर टीका
नैसर्गिक संकटात ही सरकार दुजाभाव करत असल्याचा केला आरोप
कोल्हापूर
चार दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे शिरोळ तालुक्यात भाजीपाल्यासह पिकांचे नुकसान
शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च गेला वाया
नांदणी गावातील शेतकरी अभिजित पाटील यांनी ढबू मिरचीच उभं पीक टाकलं काढून
सोयाबीन, भुईमूगसह सर्वच पालेभाज्यांचा पिकांना परतीच्या पावसाचा फटका
त्र्यंबकेश्वर, नाशिक
– त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातून मद्य आणि मांस विक्रीची दुकाने हटवा
– मद्य आणि मांस विक्रीची दुकाने त्र्यंबकेश्वरपासून किमान 5 किलोमीटर बाहेर हवीत
– अटल आखाड्याचे महंत प्रज्ञानपुरी यांची मागणी
– भाविकांनी मंदिरातील सशुल्क दर्शन टाळून मंदिरांवर आर्थिक बहिष्कार टाकावा
हिंगोली-
जिल्हा परिषेदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनात विद्यार्थ्यांनी भरवली शाळा
शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी घेतली अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा
तालुक्यातील गोरेगाव येथील विद्यार्थ्यांनी भरवली अधिकाऱ्याच्या दालनात शाळा
पुणे
अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच मंगल मोहक रूप
सोन्याच्या अलंकारांनी दगडूशेठ हलवाई गणपती सजले
गणरायाच्या गाभाऱ्याला फुल, पांनाची आणि गुलाबाची सजावट सजावट
बाप्पला फळांची आरास
गणरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
अंगारकी चतुर्थी निमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजल
अमरावती
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जाणीव प्रतिष्ठानच्यातीन पोलीस आयुक्त आरती सिंग यांना निवेदन
पोलिसांबरोबरचा वाद चिघळणार
कोल्हापूर
इचलकरंजीसाठीच्या सुळकुड पाणी योजनेला विरोध वाढला
प्रस्तावित 156 कोटीच्या सुळकूड पाणी योजने विरोधात सुळकूडसह पंचक्रोशीतील गावं एकवटली
प्रस्तावित योजनेच्या प्रतिकात्मक शासन आदेशाची केली होळी
इचलकरंजी शहराला पाणी न देण्यावर दूधगंगा बचाव समिती ठाम
सोमवारी कागल तहसील कार्यालयावर काढला जाणार मोर्चा
सुळकुड पाणी योजना मुद्दा पेटण्याची चिन्हे
आमदार नितेश राणे यांच्या विरोधात प्रहार संघटनेचं तीव्र आंदोलन
नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे कपडे फाडून आणि डोळे काढून पुतळा गाडला
पोलिसांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ प्रहार संघटना आक्रमक
नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागावी अशी मागणी करत प्रहारचे आंदोलन
ओतूर,पुणे
– ओतूर शहरातून टॅक्टर रॅली
– रॅलीमध्ये धनंजय मुंढे यांच्या सह राष्ट्रवादी चे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित
– रॅली नंतर ओतूर बाजार समितीमध्ये माजी सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंढे शेतकऱ्यांना संबोधित करणार
-जन आक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित
शेतकऱ्यांनी खासगी दवाखान्यात न जाता, सरकारी पशु वैद्यकीय दवाखान्यात जावं
तालुकास्तरावर असणाऱ्या पशु वैद्यकीय दवाखान्यात सर्व औषध उपलब्ध आहेत
खासगी दवाखान्यात आवश्यकता नसताना महागडी औषधे दिली जात आहेत
“प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम 4 (1) नुसार पशुमध्ये या रोगांची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनीही माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक
माहिती न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल
औरंगाबाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेवर चंद्रकांत खैरे यांची खरमरीत टीका
मुख्यमंत्र्यांच्या सभेला 300 रुपये आणि 500 रुपये देऊन लोक आणले होते
पैठणमध्ये आम्ही संवाद दौरा काढणार
शहाजी बापूला आवाहन चला या मातोश्रीवर जाऊ तुम्हाला इकडे पण चांगली खुर्ची देतो
रावसाहेब दानवे यांनी भुमरे यांना बोका म्हटला, मला अनेक फोन आले बोका कसा वाटला म्हणून,
गोमूत्राने जंतू मारतात, येणाऱ्या 27 तारखेला गद्दारीचे जंतू मरतील
एकनाथ शिंदे हेच गलिच्छ राजकारण करतात, त्यांनी उपकार मानले नाहीत
मुख्यमंत्री घाबरलेल्या अवस्थेत होते त्यांच्या भाषणात दम नव्हता
राज्यातील 21 जिल्ह्यात लम्पि या आजाराचा प्रादूर्भाव
या 21 जिल्ह्यातील 338 गावातील 2664 गाई आणि बैल यांना यांना संसर्ग
आतापर्यंत 5 लाख 15 हजार 120 जनांवारांचे लसीकरण
पाच किलोमीटरच्या परिघात 14 लाख 49 हजार 741 जनावरांचे लसीकरण करायचे आहे
सध्या राज्यात 16 लाख 38 हजार 800 लस उपलब्ध
आज आणखी 5 लाख लस उपलब्ध झाल्या आहेत
लसींची कोणतीही कमरतात भासणार नाही
लम्पि चर्मरोग नियंत्रणासाठी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची पत्रकार परिषद
राज्यातील 21 जिल्ह्यात लम्पी या आजाराचा प्रादूर्भाव
21 जिल्ह्यातील 338 गावातील 2664 गाई आणि बैल यांना या संसर्ग
शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन
उपचारानंतर रोग बरा होतो
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी काल लस देण्याची केली होती मागणी
नाशिक
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोन संशयिताचा वैद्यकीय तपासणीस नकार
नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रवेशद्वारावर केली तोडफोड
पोलिसांनादेखील धक्काबुक्की केल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा
पोलिसांनी संशयित आरोपीचा घेतला जबाब
घटनेचा सीसीटिव्ही व्हिडिओ आला समोर
दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शिंदे सरकारकडून महाराष्ट्रवासियांना अनोखी भेट
समृद्धी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन
नागपूर ते शिर्डी असा असणार पहिला टप्पा
राज्यातील सत्तांतरानंतर दिवाळी सणाचा नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गासाठी मुहूर्त
पुण्यात बोट सेवा सुरु करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन
पावसामुळे पुण्यात पाणी साठल्याने राष्ट्रवादीचे आंदोलन
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क इथे परवानगी मिळविण्यासाठी शिंदे गटाकडून हालचालींना वेग
-औरंगाबादच्या सभेनंतर शिवाजी पार्कमध्येही ऐतिहासिक सभा घेण्यासाठी शिंदे गटाकडून तयारी सुरू
– शिंदे गटाला परवानगी दिल्यास दादरमध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अशी गोपनीय माहिती स्पेशल ब्रांचने गृहविभागाला दिल्याची माहिती
– शिंदे गटाला एमएमआरडीए ग्राऊॅंडवर सभेची परवानगी दिल्यास शिंदे-शिवसेनेतील संघर्ष तीव्र होणार नाही असंही अहवालात नमुद
– मनपा आयुक्तांच्या निर्णयावर लक्ष
अमरावती
अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरण सीआयडीकडे
शाईफेक प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग
या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार
शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
रवी राणा यांची जामिनावर झाली होती सुटका
शिंदे फडणवीस सरकारचा अभिनंदन करतो गेले अडीच वर्षत थांबमलेल्या कामांना सुरुवात
फक्त फेसबुकवर मुख्यमंत्री होते, तीन चाकाची सरकार कुठं आणि बुलेट ट्रेन कुठं
सर्व सणांवर बंदी होती मात्र आता सर्व सण कोरोना मुक्त झाले
कोरोनाची परिस्थिती केंद्र सरकारने लसीकरणाला होता प्रारंभ त्यानंतर कोरोना गेला
ठाकरे गट हिंदुत्त्व राहिला नाही
आता त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस विचारांवर चालत आहे
केरळ
राहुल गांधी यांच्या यात्रेचा आज सातवा दिवस
भारत जोडो यात्रेला तामिळनाडूमधून सुरुवात
आज सातव्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून पदयात्रेला सुरुवात
केरळ राज्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी
जुन्नर, पुणे
– नानेघाट कोकणकडा येथील विहंगम दृश्य
– नाणेघाटात आकाशच जमिनीवर आल्याचे दृश्य
– निसर्गाचे डोळ्याचे पारणं फेडणारे वैभवशाली रुप पाहायला मिळतय
– निसर्गाचे हे पर्यटकांना भुरळ पाडणारे चित्र
– गेल्या चार ते पाच दिवसांपासून जुन्नर तालुक्यात संततधार पाऊस
गडचिरोली सुरजागड लोह खनिज प्रकल्पाविरोधात आलापल्ली अहेरी बाजारपेठ दुसऱ्या दिवशी बंद
अतिरिक्त जिल्हाधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत केली चर्चा
परंतु तोडगा काही निघत नाही अशी गंभीर परिस्थिती
या प्रकरणी गावकऱ्यांच्या कोणतेही मागणीला अधिकाऱ्यांनी मान्य केले नाही
एटापल्ली तालुक्यातून सुरजगड लोक खनिज प्रकल्पाच्या कच्चामाल आलापल्ली आष्टी मार्गे देण्यात येतो
जड वाहनांची वाहतूक या मार्गे बंद करण्यात यावी
या राष्ट्रीय महामार्गावर अनेक खड्डे पडल्याने दिवसात जड वाहनावर बंदी आणवी-वाहतुकीत खूप मोठी अडचण निर्माण होत आहे
आलापल्ली अहेरी वासियांच्या शिष्टमंडळ अधिकाऱ्यांसोबत दोन तास केली चर्चा
लोणावळा, पुणे
-लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांना मारहाण करणे चार जणांना चांगलच पडले महागात
-लोणावळा पोलिसांचा चौघांविरोधात गुन्हा दाखल
-प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देणे या कलमाखाली गुन्हा केला दाखल
-प्रियंका बालापोरीया यांनी याबाबत लोणावळा शहर पोलिसात दिली तक्रार
-या प्रकरणी नितीन आहिरे, राजेश आचार्य, संजय आचार्य, मोहन यादव या चार जणांवर गुन्हा दाखल
नागपूर
बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराची आरोपीच्या भावाकडून हत्या
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील बेलोना येथील घटना
मृत केशव मस्के हा एका बलात्काराच्या प्रकरणाचा साक्षीदार
त्या प्रकरणातील आरोपीच्या भावाने राग मनात ठेवून मृतकावर सायंकाळी गोळी झाडून केली हत्या
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भारत कळंबे याला केली अटक
तीन वर्षांपूर्वी आरोपीचा प्रेमराज कळंबे याने अल्पवयीन मुलीवर केला होता बलात्कार
त्या प्रकरणाचा केशव मस्के साक्षीदार असल्याने साक्ष बदलण्यासाठी आरोपी व त्याच्या भावाकडून वारंवार दबाव
केशव मस्के साक्ष बदलण्यास तयार नसल्याने आरोपीने केली हत्या
परभणी
स्वाभिमानाचे राजू शेट्टी यांचा आज परभणीत मोर्चा,
काही वेळत पत्रकार परिषद घेणार
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाचा जोर
पंचगंगासह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडायला सुरुवात
नदीची पाणीपातळी पोचली 29 फूट तीन इंचावर
राधानगरी धरणाच्या 3 स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीत विसर्ग सुरुच
नदीच्या पाणी पातळी होणार आणखी वाढ
सध्या शहर परिसरात पावसाची उसंत मात्र धरण क्षेत्रात संततधार कायम
नंदुरबार :
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बावनकुळे यांचा दौरा
बुथ प्रमुखांची घेणार बैठक
नंदुरबार तैलिक महासभेतर्फे बावनकुळे यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम
जिल्ह्यातील आदिवासींचे प्रशांवर बावनकुळे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष
नवी दिल्ली
राजधानीत यंदा दसरा धुमधडाक्यात साजरा होणार
रावण दहन करण्यासाठी अभिनेता प्रभास उपस्थित राहणार
तब्बल दोन वर्षांनंतर जल्लोषत साजरा होणार दसरा
रामलीला मैदानावर होणार रावण दहन
बॉलीवूड मधील दिग्गज दसऱ्यासाठी राजधानी नवी दिल्लीत येणार
शंभर फूट उंचीचे व्यासपीठ रामलीला मैदानावर उभारले जाणार
अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे रामाची मूर्ती असणार
कराड
कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडणार
धरणात येणारी पाण्याची आवक वाढली
दुपारी 2 वाजता धरणाचे सहा दरवाजे 1 फूट 6 इंचाने उघडुन 12, 891 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू
कोयना धरणात 101.57 टीएमसी पाणीसाठा धरण 96.50 टक्के भरले
पुण्यातील चांदणी चौकातील पूल 18 सप्टेंबर रोजी पाडणार
आजपासून पुलावरील वाहतूक बंद
पुलावरून होणारी वाहतूक आजपासून बंद करण्याचा निर्णय
प्रायोगिक तत्त्वावर आजपासून इथल्या वाहतुकीत बदल
ज्या नागरिकांना बावधान आणि पाषाणकडे जायचे आहे अशा नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागणार
येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी पहाटे हा पूल पाडण्यात येणार
दिल्लीतील ट्वीन टॉवर ज्या कंपनीने पाडले त्याच कंपनीला हे फुल पाडण्याचे कॉन्टॅक्ट
अवघ्या 9 ते 10 सेकंदात हा पूल जमिनदोस्त करण्यात येणार
पुणे
वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर एफडीएची कारवाई
टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर एफडीएने टाकला छापा
या छाप्यात 800 किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले
हे पनीर तयार करण्यासाठी 350 किलो स्किम्ड मिल्क पावडर व 270 किलो पामोलिन तेल साठविल्याचे आढळले
साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत 1 लाख 67 हजार 790 रूपये किमतीचे 799 किलो पनीर, 1 लाख 21 हजार 800 रूपये किंमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, 39 हजार 664 रूपये किमतीचे 268 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 3 लाख 29 हजार 254 रुपये किंमतीचा साठा जप्त
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करून नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले
पुणे
लम्‍पी पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो
यामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये
तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2330-418 अथवा राज्यातील कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 वर तात्काळ संपर्क साधावा
राज्याचे पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केलं आवाहन
मालेगाव..
सटाण्याच्या ढोलबारे-पारनेर रस्त्यावर कोटम शिवारालगतच्या केलेल्या पुलामुळे 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान
रस्त्याअभावी ट्रॅक्टर व इतर वाहने मुख्य रस्त्यावर घेऊन जाता येत नसल्याने शेतमाल शेतातच पडून
शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा
बदलापूरहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा उशिराने
7.06 ची सीएसएमटी लोकल 7.55 ला बदलापूरला आली
तर इतर लोकलसुद्धा जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत
कर्जत खोपोलीवरून येणाऱ्या लोकल उशिराने येत असल्याची माहिती
नाशिक
– उद्योजक शिरीष सोनवणे मृत्यूप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल
– नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा
– नाशिक रोड भागात शिरीष सोनवणे गेल्या अनेक वर्षांपासून फर्निचर व्यवसाय करत होते
– शिरीष सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव परिसरातील एका कॅनलमध्ये पोलिसांना सापडला होता
– नाशिक रोड भागातून अज्ञात लोकांनी सोनवणे यांना त्यांच्या कंपनीतून नेल्यापसून ते होते मिसिंग
– एका उद्योजकाचा मृतदेह अज्ञातस्थळी सापडल्याने उडाली होती खळबळ
– सोनवणे यांची हत्या कोणी आणि का केली याबाबत मात्र अद्याप गूढ कायम
-पोलिसांचा तपास सुरू
राज्यातील अनेक जिल्ह्यांसह शेजारील राज्यातूनही जोरदार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांना दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला असल्याने शेतीसह रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या पावसामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींनाही प्रचंड वेग आला आहे. लम्पी रोगावरुन राज्यसरकारवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत असून यंदाचा गळीत हंगाम सुरु होण्याआधी जनावरांसाठी लस उपलब्ध करुन देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. त्यामुळे राज्यातील पावसाच्या घडामोडींबरोबरच राजकीय घडामोडींचीही माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील आज कोणत्या भागात जोरदार, मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे, त्याचीही माहिती घेणार आहोत.
Published On – Sep 13,2022 8:19 AM
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares