Sangli : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वापाऱ्यांच्या दारात स्वाभिमानीची बोंबाबोंब, काय आहे नेमके प्रकरण ? – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
Jul 22, 2022 | 6:55 PM
सांगली : जिल्ह्यात (Turmeric Production) हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवाय येथील हळदीला राज्याबरोबर हैदराबादमध्येही चांगले मार्केट आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची येथे रेलचेल असते. मात्र, स्थानिक (Traders) व्यापाऱ्यानेच चक्क 2 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Farmer) शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शणास येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संबंधित व्यापाऱ्याच्या दारात बोंबाबोंब आंदोलन केले. शहरातून मोर्चा काढत सारडा यांच्या निवसस्थानासमोर हा प्रकार करण्यात आला. मात्र, व्यापारी सारडा यांनी महिन्याभरात शेतकऱ्यांचे पैस परत करतो असे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले.
हळदीचे व्यवहार हे चोख असतात पण शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा उचलत सारडा व्यापाऱ्याने तब्बल 2 कोटी रुपये थकीत ठेवले होते. सातत्याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली जात होती. गेल्या अनेक महिन्यांपासून व्यापाऱ्याने सातत्याने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या कानावर गेली. त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन शहरातील मुख्य मार्गावरुन मोर्चा काढत व्यापाऱ्याच्या दारासमोर बोंबाबोंब आंदोलन करताच व्यापारी सरडा यांनी पैस देण्याचे आश्वासन दिले.
एकीकडे राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाला सामोरे जात आहे. असे असताना बाजारपेठेत कोट्यावधी रुपये अडकले आहेत. सांगली जिल्ह्यात हळदीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. शिवाय ठरल्याप्रमाणे व्यवहार न झाल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत होत्या. बाजार समितीनेही हात वरी केल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. मात्र, स्वाभिमानीने आक्रमकता दाखवताच पैसे देण्याचे आश्वासन व्यापारी सारडा यांनी दिले आहे.

सांगली वखारभाग येथील हळद व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना दोन कोटीचा गंडा घातला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज त्याच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. तसेच घरासमोर बोंब ठोकण्यात आली. महिन्याभरात पैसे न दिल्यास घरात घुसणार असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.हा मोर्चा पटेल चौकातून सारडा यांच्या बंगल्याकवर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. जर लवकरात लवकर व्यापारी सारडाने पैसे दिले नाही तर आंदोलन अधिक करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares