तेरणा साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी व बचाव संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलन! – AIN NEWS

Written by

Welcome, Login to your account.
Recover your password.
A password will be e-mailed to you.

उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यास डीसीसी बँकेकडून दिरंगाई केली जात असल्याच्या निषेधार्थ ढोकी येथील चौकामध्ये आज शेतकर्‍यांनी व तेरणा बचाव संघर्ष समितीने जोरदार रास्ता रोको आंदोलन करत डीसीसी बँकेविरोधात घोषणा देत रस्ता अडवून धरल्यामुळे लातूर-बार्शी मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.
मराठवाड्यातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची गेल्या बारा वर्षापासून परवड सुरू आहे. कर्जाच्या खाईत बुडालेल्या या कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी हा कारखाना भाडेततत्त्वावर देण्याचा निर्णय डीसीसी बँकेने घेतलेला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे भैरवनाथ शुगर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या ट्वेन्टीवन शुगर्स या दोघांच्या निविदांवरुन वाद निर्माण झाला. या वादावर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर चालू हंगामात हा कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा तेरणा साखर कारखान्याचे कामगार, सभासद शेतकर्‍यांना होती. मात्र अद्याप कोणत्याच हालचाली दिसत नसल्यामुळे तेरणा बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी ढोकी येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करुन कारखाना सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले. कारखाना तात्काळ सुरू न केल्यास डीसीसी बँकेच्या विरोधात उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संग्राम देशमुख, गफार काझी, निहाल काझी, अमोल समुद्रे, राहुल वाकुरे, सतीश देशमुख, गुणवंत देशमुख, तानाजी जमाले, सतिष वाकुरे , विलास रसाळ, डी.एम.पाटील, बारीसाहेब काझी यांनी यावेळी दिला. आंदोलनात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अनंत साखरे AIN न्यूज उस्मानाबाद.
Prev Post
पशुपालन शेतकऱ्यांनी लप्मी आजाराची काळजी घेण्यासाठी सांगितला उपाय!
Next Post
संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा परळीकरांना अभिमान- डॉ.संतोष मुंडे!
संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा परळीकरांना अभिमान- डॉ.संतोष मुंडे!
पशुपालन शेतकऱ्यांनी लप्मी आजाराची काळजी घेण्यासाठी सांगितला उपाय!
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान!
लम्पि आजार रोखण्यासाठी जनावरांना लसीकरण कारण्याची मागणी!
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीनची चिमणी पाडून या कामाला पूर्णविराम!
निवेदने,तक्रारी,उपोषण,आंदोलन,निवडणुकीवर बहिष्कार टाकुनही पुलाचे काम होईना!

Leave A Reply


Your email address will not be published.
This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
Recent Posts
संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा परळीकरांना अभिमान- डॉ.संतोष मुंडे!
हिन्दू धार्मियांच्या भावना दुःखावल्याबाबत सबंधित अधिकाऱ्यावर कारवाही…
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान!
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीनची चिमणी पाडून या कामाला…
Recent Posts
संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा परळीकरांना अभिमान-…

पशुपालन शेतकऱ्यांनी लप्मी आजाराची काळजी घेण्यासाठी सांगितला…
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान!source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares