बैठकांचे आयोजन: आमदार शंकरराव गडाख पाचेगावकरांकडून सन्मान – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
नेवासे तालुक्यातील पाचेगाव ,पुनतगाव या गावांना श्रीरामपूर विभागामार्फत विदयुत पुरवठा होत असल्याने या गावांमध्ये नेहमी विजेची समस्या निर्माण होते. नेवासे तालुक्यातील पाचेगाव,पुनतगाव या गावांसाठी नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे वीज सबस्टेशन व्हावे व विजेची समस्या दूर व्हावी ही ग्रामस्थांची मागणी होती. आमदार शंकरराव गडाख यांनी पाचेगाव परिसरातील ग्रामस्थ,शेतकरी यांची विजेची गैरसोय लक्षात घेऊन २०२० पासून व्यक्तिगत पाठपुरावा करत,तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांकडे अधिकाऱ्यांसह बैठकांचे आयोजन करून पाचेगाव सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लावला.
आमदार शंकरराव गडाख यांनी पाचेगाव वीज सबस्टेशन मंजूर करून पाचेगाव व परिसरातील ग्रामस्थ शेतकरी यांची होणारी विजेची गैरसोय दूर केली. पाचेगाव येथे सबस्टेशन मंजूर झाल्यामुळे पूर्ण दाबाने वीज मिळणार आहे. ऐनवेळी विजेचा होणारा खोळंबा व त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. आमदार गडाख यांनी पाठपुरावा करून पाचेगाव येथे स्वतंत्र वीज सबस्टेशन मंजूर केल्याबद्दल पाचेगाव ग्रामस्थांनी आमदार गडाख यांना पेढा भरवून सत्कार केला. याप्रसंगी दिगंबर नांदे, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब शिंदे, वामन तुवर, भागवतराव पवार, जालिंदर विधाटे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares