मार्कंडेय नदी काठ परिसरातील पिके पाण्याखाली – Tarun Bharat – तरुण भारत

Written by

उघडीप दिल्यास शेतकऱयांना मिळणार दिलासा : अद्यापही चिंता कायम : मार्कंडेय नदीवरील जुना पूल तिसऱयांदा पाण्याखाली
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन पाच ते सहा दिवस पडलेल्या पावसामुळे कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीवरील जुने पूल तिसऱयांदा पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे परिसरातील शेती पिकांना फटका बसण्याची शक्मयता नाकारता येत नाही. जर पाऊस कमी झाला तर पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे पाऊस कमी व्हावा, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत. मंगळवारी मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली होती. त्यामुळे पाऊस कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंगळवारी अधूनमधून हलक्मया सरी कोसळत होत्या. शनिवार रात्री तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक घरांची पडझड झाली होती. तर नदीकाठ परिसरात असणाऱया पिकेही पाण्याखाली गेली आहेत. जर दोन दिवस पावसाने उघडीप दिली तर ही पिके तारणार आहेत. अन्यथा शेतकऱयांना पुन्हा भात लागवड करावी लागण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
पुन्हा पावसाची धास्ती
पडलेल्या पावसामुळे दोन दिवस जनजीवन देखील पूर्णपणे गारठून गेले. शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले आणि जलशयांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली.  तलाव आणि नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. शिवाय मार्कंडेय नदीदेखील दुथडी भरून वाहू लागली आहे. यंदाच्या वर्षात कंग्राळी खुर्द येथील जुन्या पुलावर तिसऱयांदा पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱयांना पुन्हा पावसाची धास्ती निर्माण झाली आहे.
दरम्यान, कंग्राळी खुर्द, कडोली, गौंडवाड, काकती, होनगा, देवगिरीसह इतर गावातील पिकांना आता धोका निर्माण झाला आहे. जर पाऊस कमी झाला नाही तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. सध्या नदीकाठाखालील बरीच भात पिके पाण्याखाली गेली आहेत. पाऊस पुन्हा वाढल्यास पिकांना धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. पावसाने लवकर उघडीप देण्याचा धावा ते करत
आहेत.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares