शेतकरी आंदोलन – दिल्ली, यूपीसह उत्तराखंडमध्ये उद्या होणार नाही चक्का जाम – Loksatta

Written by

Loksatta

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपक्षाही जास्त दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या(शनिवार , ६ फेब्रवारी) देशभरात चक्का जाम आंदोलन केल जाणार आहे. मात्र, दिल्लीसह उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे उद्या चक्का जाम होणार नसल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आज सांगतिलं आहे.
ही माहिती देताना राकेश टिकैत म्हणाले, ”जी लोकं इथं येऊ शकले नाहीत, ते आपआपल्या ठिकाणी शांततेत चक्का जाम करतील, हा चक्का जाम दिल्लीत होणार नाही.”
जो लोग यहां नहीं आ पाए वो अपने-अपने जगहों पर कल चक्का जाम शांतिपूर्ण तरीके से करेंगे। ये जाम दिल्ली में नहीं होगा: राकेश टिकैत, भारतीय किसान यूनियन के राष्ट्रीय प्रवक्ता pic.twitter.com/ENXDH0pWs4
— ANI_HindiNews (@AHindinews) February 5, 2021

तसेच, ”उद्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील चक्का जाम आंदोलन केले जाणार नाही. दिल्ली सोडून देशाच्या अन्य भागातील रस्ते बंद केले जातील. याचे कारण म्हणजे त्यांना कधीही दिल्लीला बोलावलं जाऊ शकत, त्यामुळे त्यांना स्टॅण्डबाय ठेवलं आहे.” असं देखील टिकैत यांनी म्हटलं आहे.
There will be no road blockade in Uttar Pradesh and Uttarakhand tomorrow; roads will be blocked in rest parts of the country excluding Delhi. The reason is that they can be called to Delhi any time, so they are kept on standby: Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union pic.twitter.com/5F1jddM7j8
— ANI (@ANI) February 5, 2021

शेतकरी नेत्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना राकेश टिकैत म्हणाले, यावेळीचा चक्का जाम केवळ तीन तास(दुपारी १२ ते ३ ) या वेळेत होईल. या काळात शेतकरी आपआपल्या भागांमधील रस्ते जाम करतील आणि रस्त्यांवर बसून विरोध दर्शवतील. तीन तासानंतर आंदोलकांकडून गाव, ब्लॉक, जिल्हास्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल.
तर , या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, चक्का जामबाबत आमच्याशी कोणत्याही नेत्याने संपर्क साधलेला नाही. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामधील पोलीस याबाबत अधिक गंभीर आहेत.
मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be no road blockade in uttar pradesh and uttarakhand tomorrow rakesh tikait msr

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares