चेतन नरके – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
50365
फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी
आधुनिकतेची गरज ः डॉ. चेतन नरके
कोल्हापूर, ता. १५  : भारतातील दुग्धव्यवसाय आणि कृषी संस्कृतीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था शाश्वत बनली आहे. पण, दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर बनविण्यासाठी व जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करण्याची गरज असल्याचे मत डॉ. चेतन नरके यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघातर्फे नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक डेअरी शिखर संमेलनातील तांत्रिक परिषदेत ‘डेअरी उद्योगातून निर्माण झालेले ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत अर्थचक्र'' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
डॉ. नरके म्हणाले, की भारतात प्राचीन काळापासून या व्यवसायाला कृषी संस्कृतीशी जोडून लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचा भाग बनवले. भारतात हजारो वर्षांपासून पशुधन आणि कृषी संस्कृतीमधूनच जगाला आकर्षित करणारी समृद्धी आणि एक शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. शाश्वत अर्थचक्रात मानवी मूल्ये, पर्यावरणाचे रक्षण, आदर्श समाजव्यवस्था आणि परस्परपूरक अशा समाजजीवनाची बीजे लपली आहेत. भारतात या व्यवसायातील ७० टक्के जबाबदारी या महिला घेतात. त्यामुळे महिला आत्मनिर्भर बनण्यात त्यांचे सबलीकरण आणि महिलांचे सामाजिक नेतृत्व निर्माण करणे हजारो वर्षे या उद्योगामुळे शक्य झाले आहे. 
ते म्हणाले, की नैसर्गिक अथवा कृत्रिम रेतन, वासरू संगोपन, आरोग्य सेवा, पशुखाद्य, वैरण निर्मिती, गोठा व्यवस्थापन, दूध आणि दुधापासून निर्माण होणारे असंख्य उपपदार्थ अगदी गोमूत्र आणि शेणही आर्थिक स्रोत निर्माण करतात. या कारणाने भाकड जनावरेही अगदीच निरुपयोगी ठरत नाहीत. शेतकरी आत्महत्या ही भारतातील प्रमुख समस्या आहे. पण, पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायामुळे येथील एकाही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली नाही. 
सात लाखांहून अधिक शेतकरी आणि हजारो उद्योजकांची यशोगाथा ‘गोकुळ’मुळे निर्माण झाली आहे. या वेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सचिव वर्षा जोशी, ‘एनडीडीबी‘चे टीम लीडर नरेंद्र कराडे, रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे, केंचुरो टोयोफुको आदी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares