पशुवैद्यकीय डॉक्टरचा प्रताप!, लम्पीच्या लसीऐवजी दीडशे जनावरांना दिली दुसरीच लस – MSN

Written by

अमरावती :
अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नाही. अशातच लम्पी आजाराचे ( Lumpy Skin Disease Vaccine ) मोठे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. राज्यात लम्पी आजाराची लागण अनेक जनावरांना झाली आहे. राज्य सरकारने त्यावर तातडीने कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यावर तात्काळ अंमलबजवाणी सुरू झाली आहे. याद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना तातडीने लम्पी लस टोचून घ्यावी असे आवाहन राज्य सरकार तर्फे करण्यात येत आहे. टाकरखेडा पूर्णा येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्याने मात्र जनावरांना लम्पी लस देण्याऐवजी ब्रूसीलॉसिस ही लस जनावरांना टोचल्याने अनेक जनावरे मृत्यूच्या दारात उभे आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा या गावात लम्पी आजाराचे मोठे संकट जनावरांवर आलेले आहे. जनावरांना लस देण्यासाठी गावात लसीकरणाचा कॅम्प पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सातव यांनी आयोजित केला होता. आपल्याकडे लस उपलब्ध झाल्याची माहितीही त्यांनी सर्व पशुपालकांना दिली होती. त्या प्रमाणे गावातील ग्रामस्थांनी आपआपली जनावरे लसीकरण ठिकाणी आणली. यानंतर लसीकरणला सुरुवात झाली. मात्र डॉ. सातव यांनी लम्पी लस ऐवजी ब्रूसीलॉसिस ही लस टोचली व काही वेळातच अनेक जनावरे ही अस्वस्थ झाली आहेत.
क्विंटलला १४ हजारचा भाव असताना शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच, पावसामुळे
ब्रूसीलॉसिस ही लस दिल्यानंतर अनेक जनावरांनी चारा, पाणी पिणे सोडून दिले आहे. ही लस दिल्यामुळे अनेक गायी व बैलांच्या मानेवर गाठी आल्या आहेत. डॉ. सातव यांनी ब्रूसीलॉसिस ही लस लम्पीच्या नावाखाली दिली. पण ही लस केवळ लस ९ महिन्यांच्या आतील जनावरांना तसेच प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच देण्यात येते. त्याशिवाह ही लस जनावरांना देता येत नाही. मात्र डॉ. सातव यांनी कोणताही विचार न करता तब्बल दीडशे जनावरांना ही लस टोचली आहे. त्यामुळे अशा बेजवाबदार डॉ. सातव यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. डॉ. सातव विरोधात उग्र आंदोलन करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी दिला आहे.
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात मोठे अपडेट्स, २ महिन्यांनंतर NIA कडून घोषणा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares