वारकरी संप्रदायात वेगवेगळ्या शक्तींची घुसखोरी, शरद पवार म्हणाले, 'काळजी नको मी…' – MSN

Written by

पुणे :
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करत आहेत. वारकऱ्यांचा वेष धारण करून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी खंत वारकरी शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मांडली. त्यावर वारकऱ्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकली पाहिजे. यासाठी कृतिशील कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल. वारकरी परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करेन, अशा शब्दात पवारांनी वारकरी शिष्टमंडळाला आश्वस्त केलं.
महाराष्ट्रात संतांच्या विचारांचा वारसा चालवणारे, संताचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून जनमानसात रुजवणारे अनेक कीर्तनकार आणि वारकऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी वारकरी संप्रदायात वेगवेगळ्या शक्तींची घुसखोरी होत असल्याची तक्रार करत संप्रदायासाठी कृतिशील कार्यक्रम आखावा लागेल, अशी अपेक्षा वारकऱ्यांनी व्यक्त केलं. त्यावर पवारांनीही सहमती दर्शवली.
पवार म्हणाले “संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपासून सुरू झालेली वारकरी परंपरा आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेली धारकऱ्यांची परंपरा. या दोन्ही परंपरा टिकवण्याची जबाबदारी संत परंपरेत काम करणाऱ्या या कीर्तनकारांकडे येऊन ठेपली आहे. मात्र सध्या महाराष्ट्राच्या या वारकरी संप्रदायात आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करत आहेत. वारकऱ्यांचा वेष धारण करून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत वारकरी शिष्टमंडळाने माझ्यासमोर मांडली”.
महाराष्ट्रात संतांच्या विचारांचा वारसा चालवणारे, संताचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून जनमानसात रुजवणारे अनेक कीर्तन… https://t.co/MKbxqEZ6ML
“महाराष्ट्राच्या गावोगावी जाऊन संतांचे खरे विचार पोहोचवणारे कीर्तनकार हे शेतकरी कुटुंबातून येतात. संताचे विचार टिकावेत, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी त्यांनी काही कल्पना माझ्यासमोर मांडल्या. यासाठी मूल्यशिक्षणामध्ये काही बदल करता येतील का, वारकरी संप्रदायाचे मेळावे किंवा चर्चासत्र भरवता येतील किंवा वारकरी शिक्षण परिषद किंवा वारकरी संशोधन संस्था सुरू करता येईल का, अशा सूचना शिष्टमंडळाने मांडल्या”, असंही पवारांनी सांगितलं.
नवीन पिढी व्यसनाधीनता किंवा अंधश्रद्धेकडे न झुकता संतांचे विचार आचरणात आणेल, यासाठी कृतिशील कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल, अशीही भूमिका वारकऱ्यांनी मांडल्याचं पवारांनी सांगितलं.
वारकऱ्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकली पाहिजे, या मताचा मी देखील आहे. वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांना ज्या समस्या भेडसावत आहेत किंवा त्यांच्या प्रश्नांसाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन काम करावे लागेल. एक चळवळ म्हणून याकडे पाहावे लागेल. वारकरी परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करेन, असं आश्वासन शिष्टमंडळाला पवार यांनी दिलं.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares