वितरीका बंदिस्त केल्याने शेतकरी आक्रमक – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
वडगाव निंबाळकर, ता. १५ : येथील बनकरमळा (ता. बारामती) परिसरातून गेलेल्या वितरीकेचा प्रवाही मार्गावर तारेचे कुंपन घालून बंदीस्त केले आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, पाटबंधारे विभागाने वितरिके लगतचे अतिक्रमण हटवावे आणि आपली हद्द निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
नीरा डावा कालवा वरील वडगाव निंबाळकर पाटबंधारे कार्यालयाशेजारून जाणाऱ्या अकरा नंबरची वितरिकेवर अनेक शेतकरी आपली शेती भिजवत आहेत. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेली कालव्याची वितरिकेचा प्रवाही मार्ग बदलण्याचा प्रयत्न बनकर वस्तीनजीक मेहता यांच्या शेतालगत केला आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी या भागातील शेत जमिनीचे तुकडे करून यामध्ये प्लॉटिंग केले आहे. संबंधित व्यक्तीने पाटबंधारे विभागाची वितरिका मोडीत काढून पाण्याचा मार्गच बदलण्याचा प्रयत्न केला. याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला संपर्क साधला असता वितरिकेची जबाबदारी पाणी वापर संस्थांना दिले आहे, असे सांगण्यात आले.
आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यरत असणाऱ्या हनुमान पाणी वापर संस्थेतील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. संस्थेचे सचिव दादासाहेब सूर्यवंशी यांनी भेट देऊन वितरिकेची पाहणी केली. याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले ना.ही पाटबंधारे विभागाने अतिक्रमण करून वितरिका अडवणाऱ्या विरोधात कारवाई व्हावी पाटबंधारे विभागाच्या केलेले कंपाऊंड त्वरित काढून घ्यावे. अन्यथा शेतकऱ्यांचे वतीने आंदोलन करण्यात येईल, असे ठणकावून सांगितले.
अखेर अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला याबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे ठरले. यावेळी माजी सरपंच जीवन बनकर, विठ्ठल हिरवे, महादेव शिंदे, बाळासो हिरवे, शिवाजी नेवसे, प्रतिक हिरवे, उदय शिंदे जयवंत हिरवे, संदीप हिरवे यांच्यासह वितरिकेवरील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
01559
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares