शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – रेणुका सिंह – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
देशातून इंग्रज गेले, मात्र शाही सुरू आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्यांची अडवणूक करत असतील तर लोकप्रतिनिधीनी लक्ष देणे आवश्यक आहे.
नारायणगाव – देशातून इंग्रज गेले, मात्र शाही सुरू आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्यांची अडवणूक करत असतील तर लोकप्रतिनिधीनी लक्ष देणे आवश्यक आहे. प्रशासन, राज्य शासन व केंद्र शासन यांचा समनव्यय साधून शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व समस्या सोडविणार असून कांदा प्रश्न सोडवण्यासाठी कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा करणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन केंद्रीय जनजाती कार्य विकास राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी केले.
लोकसभा प्रवास योजना या अंतर्गत भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज दुपारी येथील निलायम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी देश विकासासाठी भारतीय जनता पक्षाची भूमिका या बाबत केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जुन्नर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आशा बुचके यांच्या हस्ते यांच्या हस्ते राज्यमंत्री रेणुका सिंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, एकनाथ पवार, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, विघ्नरचे संचालक संतोष खैरे, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, वंदना कोंदरे, धर्मेंद्र खांडरे, शरद बुट्टे पाटील, अर्चना माळवदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह म्हणाल्या सर्वसामान्यांची प्रगति, देशाचा विकास हेच भारतीय जनता जनता पक्षाचे ध्येय आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये समस्यांची माहिती घेण्यासाठी मी आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या जाणून त्या सोडवणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा अभ्यास करून या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना कसा देता येईल याची माहिती घ्यावी. देशातून इंग्रज गेले मात्र बाबुशाही सुरू आहे. अशी टीका या वेळी त्यांनी केली. २०१४ पूर्वीचे सरकार व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे लक्ष देत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशातील गरीब जनतेसाठी काम केले आहे. किसान सन्मान योजनेचा लाभ देशातील बारा करोड शेतकऱ्यांना झाला आहे. आयुष्यमान कार्ड, उज्वल गॅस, सुकन्या समृद्धी, बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता अभियान आदी योजना सुरू केल्या. महाराष्ट्र कृषिप्रधान आहे. महाराष्ट्राचा विकास केल्याशिवाय देश विकासाची कल्पना होऊ शकत नाही. देशाचा आत्मा शेतकरी आहे. किसान बिल लागू झाले असते तर शेतकरी सुखी झाला असता. आर्थिक प्रगतीमध्ये जगामध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे. भारत सर्वात विकसित देश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिरूरचा खासदार जनतेत नाही
केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्या म्हणाल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने निवडणूक दिलेला येथिल खासदार जनतेत नाही. त्यांना त्यांच्या घराकडे जाणार रस्ता करता येत नाही.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares