शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मुंबई, ता. १५ ः उत्तर मुंबईतील विभाग क्रमांक एकमध्ये शेकडो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्यानंतर तेथे शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.
सुर्वे यांच्या दहिसर अशोकवन येथील जनसंपर्क कार्यालयात बुधवारी हे पक्षांतर झाले. या वेळी या विभागातील प्रभाग क्रमांक तीनच्या महिला उपशाखासंघटक अंजना देशमुख, गटसंघटक निर्मला पांचाळ, भाजप महामंत्री रजनी शुक्ला तसेच प्रभाग क्रमांक चारमधील गटसंघटक शालिनी शेट्टी व संध्या राठोड, वैशाली पाटील, बेबी डगळे, चंद्रिका पटेल, स्वाती पवार, विजया जाधव, मनीषा मौर्या, वर्षा कुळये, शुभांगी शिंदे यांच्यासह शेकडो महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.
तर बोरिवली विधानसभा क्षेत्राचे प्रभाग क्रमांक १६ चे माजी शाखाप्रमुख सुरेंद्र शिंदे, माजी शाखाधिकारी सुमीत पाटील, गटप्रमुख गणेश गुप्ता व रमाकांत इंगरुळकर, ज्‍येष्ठ शिवसैनिक गुरुकाका ऐरगावकर, स्थानिय लोकाधिकार समितीचे सदस्य प्रकाश कदम व शिवसैनिक नीलेश दीक्षित यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शेतकरी, बेरोजगार, भूमिपुत्र यांचे हितरक्षण केवळ शिवसेनाच करेल. आम्ही शहरातील समस्या सोडवू आणि प्रत्येकाला शिक्षण देऊ, असे सुर्वे या वेळी म्हणाले. या वेळी मागाठाणे महिला संघटक मीनाताई पानमंद, शाखासंघटक सुषमा गायकवाड, मंगेश पांगारे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
नगरसेवक परमेश्वर कदमही शिंदे गटात
घाटकोपर ः मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे आजतागायत वर्चस्व हे कायम राहिले आहे. मात्र आगामी मुंबई महनगर पालिकेवर सत्ता कायम ठेवणे शिवसेनेला मोठे आव्हान ठरत आहे. शीतल म्हात्रे, अमय घोले यांच्या नंतर आता घाटकोपर पूर्व प्रभाग क्रमांक १३३ चे शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कदम यांना शिंदे गटाचे विभागप्रमुखपदी निवड झाल्याचे पत्रक शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares