शेतकरी संघटनेचा इशारा: उसाचे दुसरे पेमेंट आठ दिवसांत जमा करा; अन्यथा आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शासन निर्णयानुसार एफआरपी त्याच १५ दिवसात देणे बंधनकारक असताना तीन महिन्यांचा कालावधी होऊनही सन २०२१-२२ चे दुसरे पेमेंट अदा केले नाही. त्यामुळे कायदेशीर ३४९ रुपये प्रतिटनाप्रमाणे आठ दिवसांच्या आत ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्य अनिल औताडे व तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी दिला.
याबाबत कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२१-२२ चा गाळप हंगाम बंद होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला. कारखान्याकडून २४०० रुपये प्रतिटनाप्रमाणे अदा झाले. परंतु शासन निर्णयानुसार ज्या त्या हंगामातील एफआरपी त्याच हंगामात देण्याचे सुचित केले आहे. त्यानुसार दहा टक्के साखर उताऱ्यास २९५० रुपये प्रतिटन व त्यापुढील प्रत्येक टप्प्यास २९५ रुपये प्रतिटन तोड वाहतूक वजा जाता गाळप हंगाम बंद झाल्यापासून १५ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे.
या रक्कमेतून कारखान्याचे पहिल्या पेमेंट पोटी २४०० रुपये अदा केलेले आहे. त्यामुळे दुसरे पेमेंट ३४९ रुपये प्रतिटन अडीच महिन्यांपूर्वी कायदेशीर शासन निर्णयाप्रमाणे ऊस उत्पादकांच्या हितरक्षणार्थ देणे बंधनकारक होते. अद्यापही कारखान्याने सदर पेमेंट केलेले नसून ३४९ रुपये व अडीच महिन्याचे रक्कमेवरील व्याजासह ऊस उत्पादकांच्या खात्यात आठ दिवसांच्या आत वर्ग करावेत, अन्यथा आंदोलन केले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares