योजना, कर्जमाफीचा लाभ कधी? – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
29880
18754
योजना, कर्जमाफीचा लाभ कधी?
आंबा, काजू बागायतदारांचा प्रश्न; सिंधुदुर्गनरीत २७ ला उपोषण, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनागरी, ता. १६ ः महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी. यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी २७ सप्टेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी संघटनेच्यावतीने शासनस्तरावर गेले सात ते आठ महिने वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच आंदोलन, उपोषण छेडूनसुद्धा खावटी कर्जदारांना व दोन लाखावरील कर्जदारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील २०१५ ते २०१९ मधील २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, २०१५ पासून खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी, अल्पभूधारक व मध्यम मुदतीची कर्जे कोविड कालखंडात भरता आलेली नाहीत, यावर कर्जमाफी मिळावी, अशी मागणी निवेदनात आहे.
यावेळी शंकर घारे, गंगाराम राउळ, अशोक सावंत, वैभव तांडेल, यशवंत सावंत, गुंडू परब, सुनील घोगळे, भाई धर्ने, विजय भगत, नारायण गावडे, रमाकांत पेडणेकर, सुधीर परब, गोपाळ गावडे, यशवंत तेली, विठ्ठल माळकर आदींसह सुमारे ४० हून अधिक कर्जदार शेतकऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

चौकट
‘तोक्ते’तील नुकसान भरपाई द्या
‘तौक्ते’ वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राहिलेली नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, तसेच दरवर्षी खरीप व रब्बी पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २७ सप्टेंबरपासून लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares