Kolhapur : शेतक-यांना एक रक्कमी एफआरपी द्या; 'पंचगंगा' साखरच्या वार्षिक सभेत ठराव – तरुण भारत

Written by

कोल्हापूर / प्रतिनिधी
देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतक-यांना एक रक्कमी एफआरपी देण्याचा ठराव कारखान्याची सभासदांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे यांचे नेतृत्वाखाली मांडण्यात आला. यावेळी सर्व शेतकरी, सभासद यांनी एकजूट दाखवित संचालक मंडळास हा ठराव मंजूर करण्यास भाग पाडले. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळाने हा ठराव मंजूर करून शासनानेही एक रक्कमी एफआरपी देण्याचा शासन निर्णय करण्याचा ठराव या सभेत करण्यात आला.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares