दिव्य मराठी विशेष: अतिवृष्टी भरपाई, विम्यासाठी शेतकरी रस्त्यावर – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
गौडगाव ता. बार्शी येथील नागोबा चौक येथे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई आणि खरीप पीक विमा मिळावा यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी बैलगाडीसह सका‌ळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात गौडगाव, संगमनेर, भालगाव, आळजापूर, मिर्जनपूर, रवळगाव, रुई, झरेगाव या गावातील शेतकरी शेकडोच्या संख्येने हजर होते.
शेतकऱ्यांतून प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र आक्रोश प्रकट झाला. बारा वाजेपर्यंत कोणताही अधिकारी न आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देताच वैरागचे पोलीस पथक हजर झाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम पथकासह हजर झाले असता शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला. पर्जन्यमापक सुस्थितीत नाहीत. पर्जन्यमापक मंडळाच्या ठिकाणी नाही चुकीची आणि मोगम माहितीच्या आधारे पर्जन्याची मोजमाप होत आहे.जिल्हा कृषी अधीक्षकाना भ्रमणध्वनीद्वारे चर्चा घडवली. तहसीलदार सुनील शेरखाने यांनी निवेदन स्वीकारले. बार्शी तालुक्यातील वगळण्यात आलेले आठ मंडळाचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्याची पाहणी करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात येऊन अतिवृष्टीचे अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यानी आश्वासन दिले.
तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी शेतकऱ्यांना मोबाईल ॲप द्वारे पिकाच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवावी असे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरत्या स्थगित करण्यात आले. यावेळी राहुल भड, भास्कर काकडे, माजी सभापती लक्ष्मण संकपाळ, दादा जाधवर, रऊळगावचे सरपंच सत्यवान भोसले, मनोज भोसले, जीवन भड, बालाजी पैकीकर, नागेश काजळे, युवराज काजळे, मोहन काजळे, दिलीप गलांडे, महेश दराडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares