धरणाचे पाणी शेतात, उभ्या पिकांचे नुकसान: शेतकऱ्याचे 5 तास शोले स्टाईल आंदोलन; अधिकाऱ्यांचे शेत पाहणीनंतर ले… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
तालुक्यातील सामदा (सौदळी) लघु प्रकल्पांतर्गत 4 वर्षांपूर्वी सामदा गावाबाहेर हजारो एकर शेतजमीन शासनाने रितसर अधीग्रहण करून धरण बांधले आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून धरण क्षेत्रालगतच्या शेतामध्ये पावसाळ्यात धरणाचे पाणी शिरून उभी पहके बाधित होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकदा उपविभागीय जलसंपदा व पाटबंधारे विभागाला उर्वरीत शेतजमीन खरेदी करा, अथवा दरवर्षी होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करूनही प्रशासनाने दुर्लक्षच केले. अखेर आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाला अल्टीमेटम देवून प्रभाकर चौरपगार यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. 16) सकाळी साडेआठ वाजता गावतील ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल पाच ताय विरूगिरी आंदोलन केले.
सामदा येथील धरण प्रकल्पाला लागून चारही बाजुने आसपासच्या गावातील शेतकऱ्यांची शेती आहे. खरीपातील पेरणीनंतर पिके बहरली असताना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होवून रेषे पलीकडच्या शेतात पाणी शिरते. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन वर्षांपासून नुकसान होतेय. दरम्यान शुक्रवारी पाण्याच्या टाकीवरील चढलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी जलसंपदा व पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र शेगोकार, शाखा अभियंता अतुल बनकर, तांत्रिक सहाय्यक अभिजीत गुल्हाने यांनी सामदा गाठून शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र अमरावती येथील वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत व मागण्या पुर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आदोलनर्मित्यांनी घेतली होती.
चर्चेअंती धरणालगतच्या शेतात जावून जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मोका पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाऊस कमी झाल्यानंतर मोजणी करून सविस्तर अवहाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल व शासकीय नियमानुसार पुढील कारावाई करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने पाच तासांनी आदोलनर्त्यांनी माघार घेतली. शोले स्टाईल आंदोलनात प्रभाकर चौरपगार, पंजाबराव उकंडे, हरिदास गाळे, रुपराव नवलकार, संजय चावरे, गजानन भांडे, लक्षमण राणे आदींसह शेतकऱ्यांचा सहभाग होता. या वेळी पाण्याच्या टाकीजवळ दर्यापूर, तर धरणावर येवदा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
अधिकाऱ्यांना धरले धारेवर
प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गावाबाहेर धरणालगतच्या शेतशिवारात जलसंपदा व पाटबंधारे उपविभागीय अधिकारी रवींद्र शेगोकार यांना शेतकरी शिवाजी सपकाळ, रुपराव नवलकार, शोभा धांडगे, गणेश नवलकार, महेंद्रा भांडे यांनी तुम्ही गाडीत बसूनच पाहणी करणार का, अशा अनेक प्रश्नांचा चांगलाच भडीमार करत चांगलेच धारेवर धरले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares