Breaking News 17 September 2022 Latest Update: Project Cheetah : भारतात 70 वर्षांनंतर परतला चित्ता, नामिबियातून 8 चित्ते भारतात दाखल – Times Now Marathi

Written by

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

–  मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेचे दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने हिसकावले मंगळसूत्र
– संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
– सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत आहेत
– या मंगळसूत्राची किंमत सुमारे एक लाख रुपये होती
– ही घटना बेलापूर येथील कोर्टच्या समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला आहे


भर रस्त्यात महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद pic.twitter.com/RhfnESMHFW
राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेतून बेदखल असलेल्या यवतमाळ अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.यातच अपघातात पुढचा नंबर आमचा तर नाही ना ? असा भीती विद्यार्थ्यांना सतावत आहे. यवतमाळ अमरावती जिल्ह्यातील आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून पुढचा नंबर आमचा तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली आहे. तीन राज्यांना जोडणारा यवतमाळ अमरावती महामार्ग सध्या मृत्यू मार्ग म्हणून शिल्लक राहिला आहे. या मार्गावर असणाऱ्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील तब्बल ३४ शाळेतील विद्यार्थ्यांनी ८ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे.


आठ हजार विद्यार्थ्यांनी मंत्री नितीन गडकरींना का लिहलं पत्र? pic.twitter.com/VP2Yvd5K7P
उत्तर व दक्षिण कॉरीडोर जोडण्याच्या हेतूने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या राज्यसीमेवरील अमरावती जिल्ह्यातील धामणी तालुक्यातील भोकरबर्डी या गावापासून हरिसाल, सिमाडोह, परतवाडा, अमरावती, बडनेरा,नांदगाव खंडेश्वर, नेर, यवतमाळ, उमरीपासून पांढरकवडा तालुक्यातील करंजीपर्यंत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा मार्ग अद्याप पूर्ण झाला नाही. या मार्गावरील येणाऱ्या  ३४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्याना दररोज प्रवास करावा लागतो.जीव मुठीत घेऊन घरातून शाळेतून जावे लागते.त्यामुळे अखेर दोनही जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील सावरकर नगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र लीहले आहे. यामधे विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्यावर दररोज प्रवास करतांना होत असलेल्या त्रास आणि भीती बद्दलची व्यथाच मांडल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनला रवाना, इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या अंत्ययात्रेत होणार सहभागी
President Droupadi Murmu emplanes for London, United Kingdom to attend the State Funeral of Queen Elizabeth II and offer condolences on behalf of the Government of India. pic.twitter.com/CacjmyxFJd
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवार १८ सप्टेंबर २०२२ पासून तीन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर
Defence Minister Rajnath Singh will be on a 3-day visit to Cairo, Egypt from tomorrow, Sept 18

“Looking forward to holding discussions with my counterpart, General Mohamed Ahmed Zaki to further strengthen defence cooperation between both the countries,” he tweets

(File photo) pic.twitter.com/SSbaqgtUTt
IRCTC घोटाळा प्रकरणी तेजस्वी यादव यांना मिळालेला जामीन रद्द करावा यासाठी CBI ची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा दिवस शिवसेनेकडून 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' म्हणून पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज संपूर्ण देशात वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस धुळ्यात शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला. धुळे शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक फोटोला चॉकलेट खाऊ घालत शिवसेनेच्या वतीने प्रधानमंत्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र गेल्या सात वर्षात नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन पाळलेले नाही.
यामुळे त्यांचा वाढदिवस शिवसेनेच्या वतीने बेरोजगार दिन म्हणून साजरा करत नरेंद्र मोदींना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्राच्या हक्काचा असणारा वेदांत प्रोजेक्ट गुजरातला पळवत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाखो तरुणांच्या नोकऱ्या गमावल्या असल्याचा आरोप करीत शिवसेनेने प्रधानमंत्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडून येण्यापूर्वी मोठ मोठ्या वल्गना केल्या होत्या, त्यामध्ये प्रत्येक नागरिकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये व दरवर्षी करोडो तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे फक्त आश्वासन पुरता मर्यादित राहिले त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस धुळ्यात राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करीत शिवसेनेने अनोखे आंदोलन केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं.शहरातील टाऊन हॉल परिसरात हे ध्वजारोहण पार पडलं.तसेच मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना यावेळी सत्तार यांनी अभिवादन केलं.यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासह अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करण्यात येऊन सुशोभीकरण केलं जाईल असं आश्वासन सत्तार यांनी दिलं.


पाहा कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याविषयी काय म्हणाले pic.twitter.com/dsspIrCnFt
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील असंही ते म्हणाले. सत्तार यांच्या विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेतीचे धडे देण्यात येतील घोषणेवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. मात्र आपण हे वाक्य सकारात्मक दृष्टीने म्हणालो असून नोकरी नाही लागलीच तर विद्यार्थी चांगला शेतकरी व्हावा या हेतूने म्हणालो असून यामुळे काहींना पोटशूळ उठल्याचा पलटवार त्यांनी केला. राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम जमा केल्याच देखील सत्तार यांनी म्हटलं आहे. NDRFकडून जी मदत मिळते यात बदल करण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे त्यामुळे हे बदल करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवू असंही त्यांनी म्हटलं आहे. मागच्या सरकारमध्ये तिजोरीत खडखडाट होता की नाही हे अजितदादालाच माहीत आहे. या सरकारमध्ये तिजोरीत खडखडाट असता तर शेतकऱ्यांना मदत केली असती का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
PM मोदींच्या उपस्थितीत चित्त्यांना अभयारण्यात सोडले

सलग नऊ वेळा खासदार झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन
!!..भावपूर्ण श्रद्धांजली..!! pic.twitter.com/HBrrdv4evN
नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे फडवणीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे कार्यक्रमानंतर बाहेर येताक्षणी काही तरुणांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. 
राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी आहे. माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं आहे. तब्बल आठ वेळा खासदर म्हणून निवडून गेले होते.
भारतात 70 वर्षांनंतर 'चिते की चाल' दिसणार आहे. नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. नामिबिया येथून विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत. चित्ते नामिबियाहून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले आहेत. 
विविध राजकीय नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Wishing PM Narendra Modi a happy birthday.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
हैदराबादला 1948 मध्ये भारत सरकारने निझामाच्या राजवटीविरुद्ध पोलीस कारवाई करून भारतात सामावून घेतले. वल्लभभाई पटेल यांनी पोलिस कारवाई करण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे हैदराबाद मुक्त केलं. त्याचं स्मरण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन पाळला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाचा मोबदला म्हणून एकरकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा माजी मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा बँकेच्या सभेत शेतकरी संघटनेकडून हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्याला उत्तर देताना जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या वतीने यंदा शेतकऱ्यांच्या उसाला एक रकमी एफआरपी देण्यात येईल, अशी घोषणा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.
 
दुबईहून – बेंगलोरच्या दिशेने जाणारे पार्थ हे तेलवाहतूक करणारे जहाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विजयदुर्ग किनाऱ्यानजीक बुडाले. सुदैवाने या जहाजावरील सर्व १९ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. 
 
दिल्लीच्या अँटी करप्शन ब्युरोने शुक्रवारी आम आदमी पार्टीचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. याआधी एसीबीने त्यांच्या घरावर आणि त्याच्या इतर 5 ठिकाणी छापे (Raid) टाकले. छापेमारीत 12 लाख रुपये आणि एक विना परवाना पिस्तुल जप्त केले. दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणात एसीबीने छापे टाकले आहेत. दिल्ली वक्फ बोर्ड भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे.
 
केंद्र सरकारने लम्पी त्वचा रोगाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केल्यामुळे आता राज्यातील सर्व गोवंशाचे लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे १ कोटी ३९ लाख इतकी गोवंशाची संख्या असून यापैकी आठ लाख गोवंशाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सरकारकडे २२ लाख ५४ हजार लशींचा साठा आहे. २५ लाख लशी उद्या (शनिवारी) मिळणार आहेत,’ अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
 
उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात बैठक पार पडली. यावेळी दोघांनी रशिया-युक्रेन युद्धाबरोबच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. तसेच पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना रशिया भेटीचे निमंत्रणही दिले.
 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares