कष्टकऱ्यांचे रेशनिंग सक्तीने बंद करू नका : चासकर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
महाळुंगे पडवळ, ता. १७ : ‘‘आंबेगाव तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी, आदिवासी, बारा बलुतेदार, मजूर, भूमिहीन, कष्टकरी यांना अन्नधान्य योजनेतून सक्तीने वगळू नये. अन्यथा हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान मार्फत तीव्र आंदोलन उभारले जाईल,’’ असा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिला आहे.
मंचर येथे उपविभागीय अधिकारी (महसूल) प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे यांना हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव संतोष आंबटकर, सामाजिक कार्यकर्ते कविता शेटे, भालचंद्र बोठे, गणेश राजगुरू, किशोर शिशुपाल, इंद्रजित ढोले आदी उपस्थित होते. यावेळी आंबेगाव तालुका तहसील कार्यालयात देखील निवेदन देण्यात आले आहे.
बाबाजी चासकर म्हणाले, ‘‘अनेक नागरिकांनी बँक, पतसंस्था, सहकारी संस्था, बचत गट या माध्यमातून कर्ज घेऊन ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, टू व्हीलर आदी वाहने उपजीविकेसाठी घेतली आहेत. एवढे करूनही घेतलेल्या कर्जाचे हप्तेही वेळेवर ते फेडू शकत नाही. तसेच खासगी नोकरदार यांना मिळणारा पगारही तुटपुंजा आहे. शासनाकडून दरमहा मिळणारे रेशनिंगवर गहू, तांदूळ हेच त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जेवण भागवते. त्यांना अन्नधान्य योजनेतून सक्तीने वगळू नये.’’
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares