निवेदन: लोहाऱ्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान द्या ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे इतर तालुक्याला जी मदत देण्यात आली, त्याप्रमाणे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे करण्यात आली. यासंबंधी शुक्रवारी (दि.१६) तहसीलदार संतोष रुईकर यांच्यामार्फत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारकडून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आले. या यादीत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्या अनुदान यादीतून लोहारा तालुका वगळण्यात आला आहे. लोहारा तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त १५० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तसेच शंखी गोगलगायीमुळेही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याही अनुदानातून लोहारा तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
उमरगा व लोहारा तालुक्याचे आमदार एकच असताना मदत उमरगा तालुक्याला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांना मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात करण्यात येईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे, राजेंद्र कदम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, प्रकाश भगत, सुशांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares