हिंगोलीत 4 मंडळे अतिवृष्टीतून वगळल्याने शेतकरी आक्रमक; शेतकऱ्यांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंतयात्रा – Dainik Prabhat

Written by

हिंगोली – (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई तून सेनगाव तीन मंडळ वगळल्याने गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. गोरेगाव अप्पर तहसील समोर त्याचे आंदोलन चालु आहे.  गेल्या दोन दिवसा पासून हे आंदोलन चालू आहे. दरम्यान, आक्रमक शेतकऱ्यांनी आज चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याची अंतयात्रा काढली. सेनगाव तालुक्यातील गोरगाव बाभूलगाव आजेगाव पूसेगाव हि महसुल मंडळे अतिवृष्टीतून वगळलि गेली आहेत त्यामुळे गोरगाव परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी संप पुकारला आहे
हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक मंडळात ढगफूटी देखील झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील दौऱ्यावर आले असता सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल असे आश्वासन देखील दिले होते. मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव बाभूलगाव पुसेगाव व आजेगाव हें सर्कल अतिवृष्टीतून वगळ्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झाली तालुका प्रशासनाने 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपये एवढा निधी अतिवृष्टी धारकांमध्ये वितरित होणार असे म्हटलं मात्र सेनगाव तालुक्यातील गोरेगाव,आजेगाव,बाभूळगाव आणि पुसेगाव ही चारगाव मंडळ अतिवृष्टीतून वगळण्यात आली. त्यामुळे तेथील शेतकरी निराश झालेत.
हिंगोली जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांरी आमदार खासदार यांच्यावर या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी चांगलिच टिका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनतात सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल मग हि हिंगोली जिल्ह्यातील चार मंडळे अतिवृष्टीतून का वगळन्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्याचे हें राजकारण गोरेगाव येथून चालते पण हें मंडळ देखिल वगळन्यात आले आहे जोपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानिची नुकसानभरपाई मिळत नाही व आमच्या सर्व मागण्या प्रशासनाच्या वतीने मान्य केल्या जात नाहीत तो पर्यन्त आम्ही आमचा शेतकरी संप मागें घेणार नाहीत अजुन तीव्र आंदोलन करू.
गोरेगाव येथील शेतकरीच्या मागण्या
१) सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा लाभ देण्यात यावा.
२) नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे.
३) जिल्हा तसेच महाराष्ट्रभर सरसकट पिक विमा लागू करण्यात यावा.
४)कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी.
५) तत्काळ वीज बिल माफ करण्यात यावी

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares