Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचा, शेतकऱ्यांचा आवाज हरपला – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पश्चिम महाराष्ट्राततील शेतकरी संघटनेचे संस्थापक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पीजी पाटील ( पांडुरंग गणपती पाटील) वय ७७ रा वाकरे ता करवीर यांचे निधन झाले ,शेतकऱ्यांचा आवाज हरपला अशा भावना, शेतकरी संघटनेचे नेते व शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होत आहेत.पीजी पाटील यांनी कॉलेजच्या जीवनापासून संघटनात्मक कामाला सुरुवात केली, सुरुवातीला जनता दलातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, ऊस दर ,दूध दर आंदोलनाला सुरुवात केली, यशवंत बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली, यानंतर रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. ऊस दराचे आंदोलन त्यांनी उत्तम पद्धतीने हाताळले, उसाला सातशे रुपये दर त्यावेळी मिळत होता, तेव्हापासून तीन हजार रुपये दर मिळेपर्यंत त्यांनी आंदोलनाची धार कायम ठेवली होती.
गावात शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळावा यासाठी शेतकरी दूध संस्थेची स्थापना केली, या शेतकरी दूध संस्थेत फक्त शेतकऱ्यांचे हित जोपासले जाते, स्थापनेपासून गेली २५ वर्षे ठरावाला मूठमाती देत ,गोकुळ चे सभासदत्व नाकारणारी जिल्ह्यातील ही एकमेव दूध संस्था आहे.
उसाला दर मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने केली ,वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला आहे. खासदार राजू शेट्टी, रघुनाथ दादा पाटील, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना या संघटने बरोबर काम केले आहे.काही दिवस पीजी पाटील यांच्यावर कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते ,अल्पशा आजाराने आजचारा दरम्यान त्यांचे निधन झाले . त्यांच्या निधनाने वाकरे गावासह परिसरातील शेतकऱ्यांच्यात शोककळा पसरली आहे.
रघुनाथ दादा पाटील, शेतकरी संघटना, अध्यक्ष महाराष्ट्र ,
पीजी पाटील शेतकरी कुटुंबातील कृतीशील अभ्यासू आंदोलक व्यक्तिमत्व होते, पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, आंदोलनाची धार गेली ४० वर्षे कायम ठेवली, त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे आणि शेतकरी संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares