PM मोदींना शेतकऱ्यांचं अनोखं गिफ्ट, २१ कांद्यावर मोदींचे चित्र रेखाटून मांडल्या समस्या, पाहा Video – Times Now Marathi

Written by

नाशिक : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. देशभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात मोदींचा वाढदिवस साजरा केला जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्याबरोबर केंद्र सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याने कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी नाशिकच्या शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली. (The pains of farmers were presented by drawing Modi’s picture on onion)
अधिक वाचा : अरबी समुद्रात बुडत असलेल्या १९ जणांना तटरक्षक दलाने वाचवले
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र कांद्यावर रेखाटून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्यंगचित्रंकार किरण मोरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, तुषार खैरनार या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध पैलू दाखवणारे २१ चित्र रेखाटले आहे. या कांद्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.
देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याचा भाव हा एक ते दहा रुपयांपर्यंत मिळत आहे. पण कांद्याचा उत्पादन खर्च हा 15 ते 20 रुपये इतका असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागत आहे. 
कांदा निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे राज्यात कांद्याचे दर पडले असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री पीयूष गोयल यांना नाफेड (NAFED)मार्फत कांदा खरेदीसाठी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. नाफेडने याआधी दोन लाख ३८ टन कांदा खरेदी केला आहे. तो आणखी दोन लाख टन वाढवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares