अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात! – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
सोमवार १९ सप्टेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:31 AM2022-07-25T08:31:27+5:302022-07-25T08:33:04+5:30
रुपेश उत्तरवार

यवतमाळ : अतिवृष्टीने संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला आहे. तब्बल नऊ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांंचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तथापि, नैसर्गिक आपत्तीमधील मदतीच्या निकषात सध्यातरी कुठलेही बदल झालेले नाहीत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपयांची मदत मिळण्याचे संकेत आहेत. या निकषाने नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
३० जुलैपर्यंत नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार करायचा आहे, परंतु सततच्या पावसाने अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांचे संयुक्त पथक पंचनामे करीत आहे. पावसाने शेतातील पीक आणि सुपीक माती वाहून गेली. पुढील अनेक वर्षे पीक उभे राहणे अवघड आहे. यासाठी मोठ्या मदतीची आवश्यकता आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 
मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका
n कृषी विभागाच्या अहवालानुसार, पावसामुळे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात झाले आहे. तेथे दोन लाख ९७ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाने घेतली. 
n एक हजार हेक्टरवरील जमीन खरडून गेली. या पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्याला फटका बसला. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद आहे. सर्वेक्षणाअंती हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.
ऑगस्टमध्ये नुकसानीचे वास्तव पुढे येणार 
विदर्भ व मराठवाड्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेला अडचणी येत आहेत. अहवाल तयार होण्यास विलंब लागेल. ऑगस्टपर्यंत नुकसानीचा खरा अहवाल तयार होण्याचा अंदाज आहे.
२०१५च्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तीत कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपयांची मदतीच्या सूचना आहेत. वाढती महागाई व नुकसान पाहता, ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरेल. नवीन सरकारकडून धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. अद्याप निर्णय घेतलेला नाही.
नुकसान कुठे, किती?
(आकडे हेक्टरमध्ये)
वर्धा     १,३१०००
नागपूर     २८०००
भंडारा     १९०००
हिंगोली     १५,३०० 
गडचिरोली     १२०००
बुलडाणा     ७०००
अकोला     ८६४
नाशिक     २०००
पुणे     १,८००
नंदूरबार     १९१
रायगड     १०५
गोंदिया     ५५
ठाणे     २०
वाशिम      १०
सांगली     २
अहमदनगर     २
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares