दाभोळ-संक्षिप्त पट्टा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
फोटो ओळी
-rat१८p२८.jpg- KOP२२L५०९९२ मुरुड : चालक अविनाश चव्हाण यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.
————
एसटीचालक चव्हाण यांचा सत्कार
दाभोळ ः मुरूड येथील ग्रामस्थांच्या वतीने पिंपरी चिंचवड-मुरुड बस घेऊन येणाऱ्या बसचे चालक अविनाश चव्हाण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड-पुणे-मुरूड अशी बस घेऊन चालक अविनाश चव्हाण हे गेली १३ वर्षे मुरूड येथे येत आहेत. ते सप्टेंबरअखेर सेवानिवृत्त होत असल्याने मुरूडचे उपसरपंच सुरेश तुपे, ग्रामपंचायत सदस्य रंजन पुसाळकर, ड्रीमलँडचे अज्ञानी वरवडेकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. श्री. चव्हाण ३२ वर्षे पुणे-पिंपरी-चिंचवड आगारात सेवा बजावत आहेत.
——-
दापोलीतून ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू
दाभोळ ः दापोली बस स्थानकातून ग्रामीण भागात बंद केलेल्या बसफेर्‍या पुन्हा टप्याटप्याने सुरू करण्यात येत आहेत. कर्मचार्‍यांच्या काम बंद आंदोलनानंतर ग्रामीण बस फेर्‍या बंद होत्या. त्यानंतर कर्मचारी कामावर दाखल झाल्यानंतर गाड्यांचे दुरुस्ती साहित्य उपलब्ध न होणे, गाड्या बंद पडणे अशा समस्या सुरू होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील काही फेर्‍या बंद ठेवून मोजक्याच फेर्‍या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र गणपती उत्सवानंतर दापोली बस स्थानकातून पुन्हा ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
—————
भंडारी पतसंस्थेची सभा
दाभोळ ः दापोली येथील भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पेन्शनर्स असोसिएशन सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर यांचे अध्यक्षतेखाली झाली. सभेत तोडणकर यांनी संस्थेच्या २६ वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. व्यवस्थापक पराग भाटकर यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. त्यास सर्वानुमते मंजुरी दिली. ३१ मार्च २०२२ चा अहवाल व ताळेबंद नफा तोटापत्रकास व अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. पतसंस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थापक सदस्य व आजी-माजी सदस्य, कर्मचारी व पिग्मी एजंट यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक प्रेमानंद महाकाळ यांनी संस्था स्थापनेबाबत माहिती दिली.
दापोलीत पाऊस सक्रीय
दाभोळ ः तालुक्यात गेले महिनाभर गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय झाल्यामुळे शेतकरी राजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हाच पाऊस कायम पडत राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. कृषी विद्यापीठाकडून पिकाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा प्रकोप पुढील काही दिवस कायम राहिल्यास भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने सध्या पावसाची आवश्यकता शेतीला होती. मात्र पाऊस अधिकप्रमाणात पुढे काही दिवस पडत राहिल्यास त्याचा पिकावर विपरित परिणाम होवू शकतो.
———
देवरूखला १, २ ऑक्टोबरला कॅरम स्पर्धा
साडवली ः कॅरम असोसिएशन ऑफ संगमेश्वरतर्फे देवरूख डी-कॅड येथे १ व २ ऑक्टोबरला तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा होणार आहेत. तालुक्यातील कॅरमपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा होणार आहेत. पुरुष एकेरी, वयस्कर गट, ज्युनिअर मुले, ज्युनिअर मुली अशा गटात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धकांनी आपली नावे दिलीप विंचू व राहुल भस्मे यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares