दूषित पाण्यामुळे बाधित जमिनीची पाहणी करा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
माळेगाव, ता. १८ः सांगवी, खांडज, नीरावागज (ता. बारामती) गावांच्या हद्दीत नीरा नदीच्या दूषित पाण्याने जमिनी मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. तिची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी करावी. त्या माहितीच्या आधारे जलसुधार योजनेवर काम करणे सोईचे होईल. फलटण तालुक्यातील प्रदुषणाला जबाबदार असलेल्या कारखादारांच्या घेण्यात येणाऱ्या बैठकीतही खरी वस्तुस्थिती समोर येईल, अशी आग्रही मागणी शिरवलीचे शेतकरी बाळासाहेब वाबळे, खांडजचे शेतकरी नितीन आटोळे यांच्यासह गावकऱ्यांनी केली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्या प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे शनिवारी (ता.१७) आल्या होत्या. त्यावेळी नीरा नदी प्रदुषणामुळे सांगवी, खांडज, शिरवली, घाडगेवाडी, मेळखी, कांबळेश्वर भागातील हजारो हेक्टर जमिनी क्षारपड होत आहेत. तसेच पावसाळ्यात पूर परिस्थिती वगळता हिवाळा आणि उन्हाळ्यात कारखांदारांचे रसायनमिश्रित दूषित पाणी वर्षानुवर्षे नदीत सोडून सोडले जाते. परिणामी जमिनींबरोबर जनावरे, मासांचे आरोग्यावरही विपरीत परिणाम झाल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. ही समस्या संचालक नितीन सातव, अनिल तावरे यांनी खासदार सुळे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याचवेळी त्यांनी या समस्येबाबत चिंता व्यक्त करीत फलटणचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर व तेथील कारखांदारांची संयुक्त बैठक लवकरच घेत असल्याचे जाहीर केले होते. तसेच सुळे यांनी जलसुधार प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी, तसेच क्षारपड जमिनींचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्रातील शास्त्रज्ञांचा सर्व्हे होण्याबाबतही मी प्रयत्नशील राहील, असेही सांगितले होते. त्याचे चांगले पडसाद बाधित गावांमध्ये उमटल्याचे पहावयास मिळाले.
शेतकरी बाळासाहेब वाबळे, अनिल तावरे, बाबूराव चव्हाण, संजय देवकाते, किरण तावरे, रणजित धुमाळ, नितीन आटोळे आदी गावकऱ्यांनीही सुळे यांच्या निर्णयाचे स्वागतही केले. याबाबत बाळासाहेब वाबळे म्हणाले, “ नीरा नदीच्या प्रदूषित पाण्याची समस्या सुटण्यासाठी वारंवार सांगवी, शिरवली, खांडज आदी नीरा नदीकाठच्या गावकऱ्यांनी आंदोलनेही केली. त्या प्रकरणात दीडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. ऐवढे होऊही या समस्येवर प्रशासनाच्यावतीने कोणत्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे नीरा नदीकाठचे शेतकऱ्यांच्या जमिनी उद्‌वस्त होत आहेत. त्यामुळे खासदार सुळे यांनी हा विषय मार्गी लावावा. प्रदूषण करणाऱ्या कारखांदारांची बैठक घेण्याआगोदर नदीकाठच्या शेतजमिनींची दुरवस्था पहावयास यावे.“
नीरा नदीचे दूषित पाणी शेतीला देऊ शकत नाही, तर नीरा डावा कालव्याचे हक्काचे पाणी शेती मिळण्याचा कालावधी तब्बल ६० ते ७० दिवसांवर पोचला आहे. कालव्याची कामे करण्यालाही काहींनी विरोध केला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील नदी काठच्या शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय होत आहे. हा अन्याय किती दिवस सोसायचा?
– रणजित धुमाळ, शेतकरी
….
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares