‘वन’विरोधात आंबोलीत आज ठिय्या आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
‘वन’विरोधात आंबोलीत
आज ठिय्या आंदोलन
आंबोली, ता. १८ ः येथील शेतकरी आणि ग्रामस्थ वनविभागाविरोधात उद्या (ता.१९) सकाळी दहाला वनक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत.
आंबोली येथील वनविभागाचे कारनामे वाढत आहेत. त्या ठिकाणी हत्तींचा कोणताही अधिवास नाही आणि तसा प्रयत्न वनविभागाकडून होत आहे. त्याला ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे. या ठिकाणी एक तस्कर हैदोस घालत असून, त्याला त्यांच्या मूळ जाग्यात मूळ ठिकाणी नेऊन सोडावे व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. कबुलायतदार गावकर जमिनीवर महाराष्ट्र शासन लागल्याने येथील वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसानभरपाई मिळत नाही. त्याऐवजी प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामा याद्वारे नुकसानभरपाई मिळावी. सौर कुंपण घालण्यात यावे. वनविभागाकडून येथील जमिनी खोदलेले चर आहेत, ते बुजले आहेत ते पुन्हा खोदावे. या मागण्यांसाठी आंबोली नांगरतासवाडी तसेच गावातील ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करणार आहेत, असे निवेदन वनविभागाला दिले आहे. यावेळी सरपंच सावित्री पालेकर, तसेच शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे आदींच्या स्वाक्षरी आहेत. सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares