संयुक्त अहवाल: बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन ; ई- पीक पाहणी नोंद करण्याची मागणी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
मारेगाव तालुक्यातील बोदाड, हिवरी, गोंडबुरांडा आदी गावातील अतिक्रमित शेतजमिनीचे ई-पिक पाहणी करुन, पिकाची नोंदी घेवून संयुक्त अहवाल सादर करण्याचे आदेशाच्या प्रमुख मागणीसाठी दलित पँथर संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष जगदीश कुमार इंगळे यांचे नेतृत्वात येथील तहसील कार्यालया समोर बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
मारेगाव तालुक्यातील बोदाड, हिवरी, गोंडबुरांडा आदी गावात अनुसूचित जमातीतील पारधी समाजाच्या भूमिहीन लोकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अतिक्रमण करुन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या खरीप हंगामात पिकांची पेरणी केली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. प्रपिवियो-२०२२/प्र. क्र.७२/११/ऐ/दि.०१ जुलै २०२२ प्रमाणे प्रत्यक्ष शेतात पिके उभे आहेत,े कृषी सहायक महसूलचे पटवारी यांना आदेश देवून ई-पीक पाहणी करून,पिकाच्या नोंदी घेवून याचा संयुक्त अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares