‘आमदार आपल्या गावी’ उपक्रम: पहिल्या टप्प्यातील 3 हजारांच्या वर तक्रारींचा निपटारा; दुसऱ्या टप्प्यात 55 ग्रा… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य लोकांच्या समस्या निकाली निघाव्यात यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत ‘आमदार आपल्या गावी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 3 हजारांच्या वर तक्रारींचा निपटारा झाला. तसेच मंगळवारपासून 55 गावात दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे.
शासन, प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व्हावे म्हणून तालुकास्तरावर अनेक अभियान राबविण्यात येतात. मात्र ग्रामस्थांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आ. प्रताप अडसड यांनी सर्वच प्रशासकीय विभागाला एकत्र आणले होते. या पहिल्या टप्प्यात 48 गावातील हजारो ग्रामस्थांच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील 3 हजारांच्या वर तक्रारींचा निपटारा झाला. प्राप्त तक्रारीतून काही तक्रारी प्रशासनस्तरावर सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतर गावातील ग्रामस्थांना गाव पातळीवर समस्या सुटाव्यात म्हणून 20 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींमध्ये आमदार आपल्या गावी या दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमाला प्रारंभ होत आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द या गावापासून अभियानाला सुरूवात होणार असून धर्मापूर, खेड पिंप्री, हिवरा, मुरादे, चिखली वैद्य, पहुर, कणी मिर्जापूर, वेणी गणेशपूर, वाटपूर शेलुगुंड, साखरा, वडूरा, कंझरा, सातारगाव, एरंडगाव, माजरी म्हसला या 24 गावात, तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळणी, कासारखेड, हिंगणगाव, निंबोली, गव्हा फरकाडे, ढाकुलगाव, अशोकनग, गव्हानिपाणी, नारगावंडी, काशीखेड, कामणापूर, घुसळी, शेंदुरजना खुर्द, निंभोरा राज, निंभोरा बोडका, सोनेगाव खर्डा, कळाशी, विरुळ रोंघे, तरोडा गुंजी, कावली अशा 20 गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे
11 गावांचा असणार सहभाग
चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमगाव, कळमजापूर, राजना, सावंगा बु., जवळा, धोत्रा, मोगरा, टिटवा, दहेगाव धावडे, दिघी कोल्हे, कोहळा जटेश्वर, कवठा कडू या 11 गावातील येथील ग्रामस्थांना आपल्या समस्या गावातच मांडता येणार आहे.
तक्रारी मांडा
पहिल्या टप्प्यात प्रशासनाच्या सहकार्याने हजारो ग्रामस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील 55 गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये येवून ग्रामस्थांनी आपल्या समस्या लेखी तक्रारी या अभियाना मध्ये मांडाव्यात, असे आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares