खड्डा अपघातास कारणीभूत: म्हसरुळ लिंकरोडवर 6 किरकोळ अपघात – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
आडगाव ते म्हसरुळ लिंकरोडवर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात होत आहे. दोन दिवसांत या खड्ड्यात सहा किरकोळ अपघात घडले. रस्ता जीवघेणा बनला आहे.
मळे परिसरातील नागरिकांनी मनपाला आॅनलाइन तक्रार केली आहे. मात्र अद्याप तक्रारीची दखल घेतली न गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आडगाव-म्हसरुळ रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने अपघातांवर नियंत्रण आले आहे. पावसाने रस्ता खचल्याने रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात दुचाकी, लहान कार आदळून अपघात घडत आहेत. धोकेदायक खड्डा बुजवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी मनपाकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्याप दखल घेतली नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. धोकेदायक खड्डा बुजवण्यात आला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिली आहे. स्थानिक लाेकप्रतिनिधींकडेदेखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे.
..तर आंदाेलन करू
लिंकरोडवर नेहमी अपघात घडतात. रस्त्याच्या मध्यभागी खड्डा पडला आहे. यामध्ये पाच ते सहा अपघात घडले आहे. दुचाकी आणि लहान कार आदळून अपघात घडत आहेत. मनपाने खड्ड्यात भराव न टाकल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाईल.- पोपट लभडे, स्थानिक शेतकरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares