जितेंद्र आव्हाड – ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण – Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Written by

Jitendra Awhad | “ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हांला…” ; वेदांता-फॉक्सकॉन कंपनीवरुन जितेंद्र आव्हाडांचे आवाहन
मुंबई : वेदांता – फॉक्सकॉन कंपनीवरुन शिंदे सरकार विरुद्ध महाविकास आघाडीत घमासान पहायला मिळत आहे. वेदांता – फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडीला कमी प्रतिसाद मिळाला. मागील दोन वर्षात योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कंपनी गुजरात मध्ये गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर याच खापर फोडलं. तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रातील उद्याेग गुजरातमध्ये गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राल धोके, असे आदित्य ठाकरे म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला काव्यात्मक आवाहन केले आहे.
ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण,
तुम्हाला छत्रपती शिवरायांची आन,
दाखवा थोडी तरी अस्मिता,
थोडा तरी स्वाभिमान.
आज मात्र झुकली महाराष्ट्राची मान
तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान …
तुम्हाला शिवरायांची आन…
असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता. आणि आताचे राज्यातील शासक इथे होवू घातलेला एवढा मोठा प्रोजेक्ट आणि महसूल गुजरातला देवून आले. फरक स्पष्ट व्हावा एवढाच शुद्ध हेतू, अशी टीका देखील आव्हाड यांनी केली आहे.
वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये अर्धसंवाहक प्रकल्प आणि डिस्प्ले एफएबी उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. वेदांता या प्रकल्पात १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गांधीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. या प्रकल्पामुळे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माहितीसाठी हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर मोठी रोजगार निर्मिती झाली असती, मात्र राजकीय नेत्यांच्या आळशीपणामुळे ही कंपनी गुजरातला नेण्यात आली. आता राजकीय नेते जरी एकमेकांवर टीका करत असले. तरी यात नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. राज्यातील नागरीकांचे नुकसान राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सजक होण्याची गरज आहे.
येत्या जून महिन्यात वेदांता – फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रात येणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर असे काय झाले की प्रकल्प गुजरातमध्ये गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून सण-उत्सव जोरात होत आहेत. ते होणारच होते, कारण कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. मात्र सरकार सण-उत्सवात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील रोजगार गुजरातमध्ये जातोय तेव्हा शिंदे-फडणवीस सरकार झोपले होते का?, असा प्रश्न सामान्य बेरोजगार विचारत आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, जी कंपनी आपल्या राज्यात जूनपर्यंत येत होती. २६ जुलैला CMO ट्वीटर हॅंडलवर ही कंपनी महाराष्ट्रात येणार असल्याचे म्हटले होते. एका महिन्यात काय घडले की कंपनी गुजरातमध्ये गेली. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असा प्रश्न राज्याला पडला आहे.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचे नेटकरी म्हणत आहेत. एकनाथ शिंदेनी ही कंपनी गुजरातला दिली, असा आरोप देखील नेटकरी करत आहेत. गुजरातमधील निवडणूकीसाठी राज्यातील महानगपालिकांच्या निवडणुका लांबवल्या जातात त्यामुळे गुजरातला एवढं महत्व का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात बेरोजगारी, शेतकरी आत्नहत्या, ओलो दुष्काळ अशा समस्या असतांना, ऐवढा मोठा प्रकल्प राजकारण्यांच्या नाकाखालून गुजरातला जातोच कसा, त्यामुळे याची चौकशीची मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या :

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares