ज्येष्ठांना हात दाखवेल तिथे एसटी थांबा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
ज्येष्ठांना हात दाखवेल तिथे एसटी थांबा
लांजा ः शासनाने ७५ वर्षे पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बसचा मोफत प्रवास या सुविधेबरोबर हात दाखवेल तेथे थांबा आणि पाहिजे तिथे उतरा ही सुविधा देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक खलील मणेर यांनी केली आहे. ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरीर थकल्यामुळे बस पकडण्यासाठी चालणे, खुप वेळा उभे रहाणे शक्य नसल्याने जेथे हात दाखवला जाईल त्या ठिकाणी बस थांबली पाहिजे आणि ज्या ठिकाणी उतरायचे त्या ठिकाणी उतरले गेले पाहिजे ही सुविधा शासनाने करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे.
——-
लांजा प्रभाग १० मधील कामे मार्गी
लांजा ः नगरपंचायतीमधील प्रभाग क्र. १० मधील भाजपचे नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी त्यांच्या प्रभागमधील केळंबे रोड, पटेल गिरण या भागात गेली कित्येक वर्ष नसलेल्या स्ट्रीट लाईटचे काम मार्गी लावले आहे. नागरिकांनी रस्ता, लाईट व पाणी या सारख्या मुलभूत गरजांच्या अभावी उद्भवणाऱ्या समस्या मंगेश लांजेकर यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यानुसार प्रभागचे विद्यमान नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी या विषयात तत्काळ लक्ष देऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून विषय मार्गी लावले.
——–
कृषीतंत्र विद्यालयात आजपासून प्रवेशफेरी
लांजा ः कृषीतंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या सन २०२२-२३ च्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी २० ते २२ सप्टेंबर या कालावधीत रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरी विद्यालय स्तरावर दर दिवशी सकाळी १० ते १.३० या वेळेत राबविण्यात येणार आहे. इच्छुक दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीतंत्र विद्यालयाने केले आहे. कृषी तंत्र विद्यालयात दोन वर्ष पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती, बौद्धिक व प्रात्यक्षिकरित्या शिकवली जाते. याचा फायदा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत, त्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाशी संपर्क साधावा.
———-
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares