दिव्य मराठी विशेष: पडझड झालेल्या उसाच्या तोडीचा प्रोग्राम महिना अगोदरच – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
पडझड झालेल्या या उसाचे नुकसान होणार असल्याने हा ऊस नोंदीनुसार न तोडता सदर उसाची एक महिना अगोदरच तोडणी करण्यासाठी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली.
अंबड तालुक्यातील अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान पाहणी पाथरवाला खुर्द येथे केली. पाथरवाला खुर्द, वडीगोद्री, पिठोरी सिरसगाव, धाकलगाव, एकनाथनगर, महाकाळा, सुखापुरी, शहापूर, दाढेगाव आदी भागातील पडझड झालेल्या उसाच्या तोडीचे प्रोग्राम एक महिना अगोदर देण्याचे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.आम्ही कुणावरही टिका करण्यासाठी आलो नसून आम्ही निकोप स्पर्धा करण्यासाठी आलो असल्याचा निर्वाळा बोलून दाखवला. वडीगोद्री येथील शासकीय विश्रामगृहात चेअरमन सतीश घाटगे यांनी पत्रकाराची संवाद साधला.
समृद्धी साखर कारखान्याच्या सभासदांना वाटप केली जाणारी साखर ही जाड म्हणजेच एम ग्रेड ची तसेच घरपोच वाटप केली जाणार आहे. सभासद शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न असल्यास एक क्विंटल साखर त्या सभासदांना विनामूल्य घरपोच दिली जाणार आहे. यावर्षी समृद्धी शुगर्सला गाळपास आलेल्या उसास दोन हजार पाचशे रुपये मॅट्रिक टन दर देणार आहे. येणाऱ्या गळीत हंगामात अतिरिक्त उसाची कोणतीही समस्या भेडसावू नये, सभासदांच्या ऊसाची वेळेत तोडणी व्हावी म्हणून कारखान्याची क्षमता अडीच हजार मेट्रिक टनावरून पाच हजार मेट्रिक टन प्रतिदिन याप्रमाणे विस्तारित करण्यात आलेली आहे.
आणि त्याचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्यात करणार आहे. कार्यक्षेत्रातील ऊसाची वेळेत तोडणी करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत. भागातील शेत शिवारात जाण्यासाठी शेत रस्ते न झाल्यामुळे ऊस तोडणी साठी मोठे आव्हान आमच्यासमोर उभे राहते. त्यामुळे या भागातील शेत रस्ते, पांदण रस्ते, शिवरस्ते हे आमच्या समृद्धी शुगर च्या माध्यमातून तसेच शासनाकडे पाठपुरावा करून करण्याचा मानस घाटगे पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी भगवान बर्वे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सुरेश काळे, युवा नेते प्रणित हर्षे, स सुजित हर्षे, माजी सरपंच विठ्ठल सुडके, पांडुरंग सुडके, प्रवीण हर्षे, जिजा पंडित, सखाराम घोडके, माजी पंस सदस्य संजय ढवळे , मेहेरनाथ हर्षे, शिवसंग्राम तालुकाप्रमुख उमेश बर्वे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares