शेतकऱ्यांना नदी किनाऱ्यावरील मासेमारीचा आधार – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सूर्या नदीच्या किनारी मुख्य ओहळात शेतातून वाहत जाणारे पाणी बांध घालून अडवून पारंपरिक पद्धतीने मासेमारी सध्या मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शेताच्या बांधामध्ये पाण्याचा प्रवाह सोडून बांबू, सागाची पाने, दगड व लाकडाचे कीव बनवून त्यावर जाळी ठेवून केली जाणारी मासेमारी शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहे.
दरवर्षी ग्रामीण भागात पावसाळ्यात बांबू, सागाच्या पानांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीला किवाची मासेमारी असे म्हटले जाते. पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून कडवाळी, मळे, कोळंबी आदी प्रकारचे हे मासे प्रवाहाबरोबर शेतात व डबक्यात शिरतात. हे मासे खूप चवदार असतात.
धामणी व कवडास धरणातून सूर्या नदीमध्ये पाणी सोडले जाते. यामुळे पाण्याचा स्तर वाढल्यामुळे हे मासे शेतात अथवा डबक्यात सापडत आहेत. सध्या खरीप हंगामात भात लावणीची कामे पूर्ण झाली असून कापणीचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे किवाची मासेमारी येथील शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहे. भात कापणीला सुरुवात होईपर्यंत हाताला काम नसल्याने आर्थिक समस्या जाणवत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आणि शेत मजूर नदीकिनारी ओहळामध्ये तसेच शेतातील पाणी जाणाऱ्या मार्गात किवाची मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
…….
या दिवसांत हाताला काम नाही, त्यामुळे आम्ही शेतात, ओहळात असे कीव तयार करून ठेवतो. यावरून पाणी वाहत जात असताना प्रवाहाबरोबर मासेही जाण्याचा प्रयत्न करीत असतात. हे मासे बांबू, कारवीच्या जाळ्यात सापडतात.
– रघू सुतार, शेतकरी, सारणी
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares