E Peek Pahani New Version – 2.0 | ई पीक पाहणी ॲप Version – 2 अशी करा सातबारा वर पिकांची नोंद

Written by

शेतकरी योजना 2022
इ-पिक पाहणी ऑनलाईन महाराष्ट्र
आज आपण या लेखात इ-पीक पाहणी संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामध्ये या इ पीक पाहणीचे उद्दिष्ट्य काय, इ पीक पाहणी काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, इ पीक पाहणी ॲप मोबाइलला मध्ये कसे घेयचे, इ पीक पाहणी नोंदणी कशी करायची, त्याच्या मार्गदर्शक सूचना या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
इ-पिक पाहणी ऑनलाईन महाराष्ट्र
राज्य सरकारने पीक पेरणीची माहिती गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः भ्रमणध्वनी वरील ॲपच्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेला आहे. इ-पीक पाहणीचा वापर १५ ऑगस्ट २०२१ पासून राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठित करून करण्यात येणार आहे.
इ-पिक पाहणी द्वारे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीक पाहणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने करून माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे तलाठ्यांचे काम सोपे होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून अधिक प्रमाणित रियल टाईम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे शेतकरी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकाची माहिती अक्षांश रेखांश दर्शवणाऱ्या पिकाच्या छाया चित्रासह उपलब्ध होऊ शकणार आहे.
टाटा ट्रस्टच्या साह्याने हा कर्यक्रम विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणालीत शेतकऱ्यांचा सहभाग आणणे शक्य झाले आहे. याचा उपयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे करंजपाडा येथे प्रायोगिक तत्त्वावर यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे. इ-पिक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यातील वीस तालुक्यां मध्ये यशस्वीपणे करण्यात आलेली आहे.
जर मोबाईल इंटरनेट सुविधांमध्ये अडचण येत असेल, तर गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल. त्या ठिकाणी जाऊन पिक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.
 नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर आलेला चार अंकी पासवर्ड कायमस्वरूपी वैध असेल. आणि तो भविष्यात वापरता येईल.
जर एखाद्या शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नसेल, तर तो दुसऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईल नंबर वरून देखील स्वतःची नोंदणी करू शकतो. एका मोबाईल नंबर वरून एकूण वीस खातेदारांची नोंदणी करता येईल.
ई पिक पाहणी म्हणजे काय?
ई-पीक सर्वेक्षण मोबाईल ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांच्या पीकाची नोंदणी ठेवायचे चे काम केले जाते. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ इ-पिक पाहणी प्रकल्पातील माहितीच्या माध्यमातून देता येतो. पीक पाहणी मुळे खाते दारांना पीक कर्ज देणे, पिक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.
Your email address will not be published.


source

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares