कार्यशाळा: जलसंवर्धनासाठी 12 गावांतील 120 महिलांना मार्गदर्शन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
स्वयंम शिक्षण प्रयोग व हिंदुस्थान युनिलिव्हर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा तालुक्यात मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल प्रकल्प राबवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील १२ गावांमध्ये महिलांची कार्यशाळा घेण्यात येत आहे. तेर येथे रविवारी (दि.११) घेण्यात आलेल्या कार्यशाळेत तेर परिसरातील हिंगळजवाडी, इर्ला, दाऊतपूर, रामवाडी, भंडारवाडी, कोळेवाडी, पवारवाडी, थोडसरवाडी, म्होतरवाडी, येवती, टाकळी, ढोकी व बुकनवाडी आदी १२ गावांमधील १२० महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.
प्रमुख पाहुणे पत्रकार बापू नाईकवाडी, सुमेध वाघमारे, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य बबलू मोमीन, ग्रामपंचायत सदस्य इर्शाद मुलाणी उपस्थित होते. प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती व शाश्वत पाण्याच्या उपलब्धतेसाठी पाण्याच्या संवर्धनावर क्लस्टर लेव्हलला कार्यशाळा घेण्यात आली.
यात सेंद्रिय शेतीचे महत्त्व, रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व सेंद्रिय शेती, कशी करावी व पाण्याच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस संस्थेचे दिपक लांडगे, राणी शिराळ, पूजा कांबळे, शहिदा मुजावर यांच्यासह १५० महिला, शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना राणी शिराळ यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares