जिल्ह्यात 190 दिवसांत 152 शेतकऱ्यांच्या आत्महत्या: एकूण आत्महत्येत 31 ते 50 वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांचे प्रम… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
आसमानी, सुल्तानी, सावकारी असा बळीराजावर चहुबाजूने बसणारा मार तसचे समस्यांचे डोंगर वाढल्याने जनमाणसाला हादरविणारे शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप सुरूच आहे. जिल्ह्यात 190 दिवसांत 152 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शासनाच्या लेखी या सर्व पात्र आत्महत्या असून यात 31 ते 50 वयोगटातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणे सर्वाधिक 51 टक्के आहे.
याच वयात मुलांचे शिक्षण, काैटुंबिक जबाबदाऱ्या, मुला-मुलींचे लग्न अशी कार्ये पार पाडायची असतात. परंतु, यासाठी हाती काहीच उरत नसल्याने त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागतो, हेच वास्तव आहे. अगदी 17 ते 30 वयोगटातील 26 टक्के आणि 51 ते 90 वयोगटातील 32 टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी जिल्हा हादरला आहे.
मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या रोखता येईल, अशी कोणतीही परिणामकारक योजना शासनाकडे नाही. शासनाद्वारे केले जाणारे प्रयत्न हे प्रभावी नसल्याचेच या आत्महत्यांवरून दिसून येत आहे. 31 ते 50 हे वय अधिक जबाबदारी पेलण्याचे राहते. त्यामुळेच एकूण आत्महत्येच्या 50 टक्क्यांवर आत्महत्या याच वयोगटातील शेतकऱ्यांच्या आहेत.
यासाठी कारणीभूत असलेल्या समस्यांची समूळ सोडवणूक करण्याचे गंभीरपणे प्रयत्नच झाले नाहीत. कारण शेतकऱ्यांबद्दल कळवळाच राहिली नाही. राजकीय पोळी शेकण्यासाठी शेतकरी आत्महत्यांचे केवळ भांडवल केले जाते. परंतु, शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होणार नाहीत, असे प्रयत्नच केले जात नाहीत.
शेतकऱ्यांसमोर चक्रव्यूह कायम
आम्ही प्रचंड मेहनत केली व करत आहोत, तरीही मेहनतीचे चीज होत नाही. शेतकऱ्यांसमोरची एक समस्या संपली की, दुसरी आवासून पुढे उभी असते. एकाचवेळी किती समस्यांना तोंड द्यायचे हा प्रश्नच आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांची तरुण पिढी पाहत आहे. समस्येच्या चक्रव्युहात शेतकरी कायम फसला आहे. त्यामुळेच तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. मजुरांची कमतरता, सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा नाही, बाजारभाव समाधानकारक नाही.
”एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की, संबधित व्यावसायिक सरकारकडे जाऊन भाव कमी करण्याची मागणी करतात, त्यामुळे पुन्हा भाव पडतात. महागाई प्रचंड वाढली आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक योजना ‘भाकड’ आहे.” – अरविंद तट्टे, कृषी अभ्यासक,लेहगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares