दौलतमधील अन्यायाबाबत डोळेझाक करु शकत नाही – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
दौलतमधील अन्यायाबाबत
डोळेझाक करु शकत नाही
आमदार पाटील; आजच्या बैठकीला उपस्थित राहणार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ : दौलत साखर कारखान्यातील निवृत्त कामगार व सध्या कामावर असलेल्या कामगारांनी आपल्या मागण्यांसंदर्भात बेमुदत संप पुकारला आहे. या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या अन्यायाकडे डोळेझाक करू शकत नाही. उद्या (ता. २२) कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत सहभाग घेऊन या प्रश्नावर खंबीर भुमिका घेणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेने थकीत कर्जापोटी कारखाना ताब्यात घेऊन तो चालवायला देण्याबाबत रीतसर टेंडर काढले होते. त्यावेळी चंदगड तालुका शेतकरी सहकारी संघ व अथर्व इंटरट्रेड कंपनी या दोघांनी टेंडर भरली होती. त्यामध्ये अथर्व कंपनीला सक्षम ठरवून बॅंक व कारखाना संचालक मंडळ यांनी हा कारखाना कंपनीला ३९ वर्षाच्या कराराने चालवायला दिला. तीन वर्षे कंपनीने गळीत हंगाम पार पाडला. या काळात या कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. कामगारांच्या संपामध्येही माझा कसलाही हस्तक्षेप नसताना काही लोक सोशल मिडीयाच्या माध्यमातून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. ही बाब चुकीची आहे. कामगारांचे आंदोलन आणि त्याच्या सोडवणुकीसाठी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून यामध्ये खंबीर भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्याची सुरवात उद्या (ता. २२) पासून करीत आहे. कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार संघटना प्रतिनिधी, कंपनीचे अधिकारी व कारखाना संचालकांची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये भाग घेऊन या विषयावर सडेतोड मत मांडणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares