मागणी: अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अतिवृष्टी, सततचा पाऊस, शंखी गोगलगाय अनुदानातून लोहारा तालुका वगळला आहे. यात लोहारा तालुक्याचा समावेश करून शेतकऱ्यांना त्वरित अनुदान द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. २०) सोलापूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील आष्टामोड येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यात सततचा पाऊस व गोगलगायीचा प्रादुर्भावामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही लोहारा तालुक्याला अतिवृष्टी नुकसानीच्या अनुदानातून वगळण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी विविध मार्गाने आंदोलन करीत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (१५ सप्टेंबर) तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात अतिवृष्टी, शंखी गोगलगाय अनुदानात लोहारा तालुक्याचा समावेश करून त्वरित शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अन्यथा रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. या शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे अनेक हेक्टर शेती बरबाद झाली. शेतकऱ्याना शेतातील पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आली.
काही शेतकऱ्यांनी नापीकीमुळे आत्महत्याही केली. याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.२०) सोलापूर – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील आष्टामोड येथे सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या वेळी मंडळ अधिकारी एम. एस. स्वामी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी परमेश्वर पाटील, वैजिनाथ कागे, गजेंद्र डावरे, महादेव कारभारी, रवी शिदोरे, मुकेश सोनकांबळे, राजेंद्र मानाळे, प्रशांत कार्ले, नेताजी पवार, यांच्यासह परिसरातील जेवळी, जेवळी दक्षिण, आष्टाकासार, भोसगा, दस्तापूर, कोळनूर पांढरी, रुद्रवाडी, विलासपूर पांढरी, हिप्परगा (सय्यद) आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares