Maharashtra Politics : हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर! काँग्रेसची – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 02 Sep 2022 02:52 PM (IST)
Edited By: श्रीकांत भोसले
Maharashtra Politics : हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर! काँग्रेसची टीका
Maharashtra Politics : राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
नाना पटोले यांनी म्हटले की, राज्यातील सध्याचे सरकार हे केवळ इव्हेंटबाज आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. आजही पंचनामेच सुरू आहेत. शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवण्यासाठी भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या एका गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. पण नंतर त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली. आजही कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला पण तो केवळ इव्हेंट आहे. अशा इव्हेंटमधून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. कृषी मंत्री हा शेती व शेतकऱ्यांची जाण असणारा असायला हवा पण सध्याच्या कृषीमंत्र्यांबाबत तसे नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार? असा सवाल ही पटोले यांनी केला. एखादा इव्हेंट करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असा त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा असल्याचेही त्यांनी म्हटले.
सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काळ्या पैशाचा वापर
भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी काळ्या पैशाचा वापर करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 3500 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. बंडखोरी केलेल्या काही आमदारांनी 50 कोटींची ऑफर असल्याचे सांगितले होते. हा काळा पैसा भाजपाकडे कुठून येतो याची सीबीआय, ईडीने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राज्यातील जे आमदार गुवाहाटीला गेले होते त्यांच्याबद्दल लोकामध्ये आजही संभ्रम असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 200 आमदार निवडून आणण्याचा दावा करत आहेत. पण फुटीर आमदारांच्या मतदार संघातच जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा पटोले यांनी केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:
Shivsena Uddhav Thackeray: मुंबईत शिवसेना गटप्रमुखांचा आज मेळावा; BMC निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणालाच मिळणार नाही? विधी विभागाचा अभिप्राय माझाच्या हाती
महिला वसतिगृहाच्या बाथरूममध्ये पाहताना एकाला अटक, आयआयटी मुंबईमधील धक्कादायक घटना
Shivsena : दसरा मेळाव्याला परवानगी मिळो वा न मिळो, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; शिवसेना नेते मिलिंद वैद्य
Mumbai Crime : बाप-मुलीच्या नात्याला काळिमा, मुलुंडमध्ये नराधमाचा सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार
Apple iPhone 14 Pro: iPhone 14 Pro फोनमध्ये सापडल्या त्रुटी, युजर्सकडून तक्रारी प्राप्त; जाणून घ्या
Todays Headline 21st September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Horoscope Today, September 21, 2022 : मेष, वृषभ आणि कन्या राशीला मिळेल यश, कुंभ राशीने राहावे सावध 
Alzheimer’s Day 2022 : …म्हणून साजरा केला जातो ‘अल्झायमर दिवस’; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
International Day Of Peace 2022 : आज आहे ‘आंतरराष्ट्रीय शांती दिवस’; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares