पुईखडी येथील लम्पी क्वारंटाईन केंद्राला वाडीपीर ग्रामस्थांचा विरोध – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पुईखडी परिसरात
विलगीकरण केंद्रास विरोध
हळदी ः पुईखडी परिसरात महापालिकेने उभ्या केलेल्या शहरातील लम्पीसदृश भटक्या जनावरांच्या क्वारंटाईन केंद्राला ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. ग्रामपंचायतने पत्रकात म्हटले आहे, वाडीपीर गावातील शेतकरी तसेच दूध व्यावसायिकांची जनावरे याच परिसरात चरण्यासाठी जातात. या केंद्रापासून गावदेखील जवळ आहे. परिणामी गावात लम्पी आजार नसतानादेखील केंद्रामुळे ही साथ गावात पसरण्याचा धोका आहे. महापालिकेने तत्काळ क्वारंटाईन केंद्र अन्य ठिकाणी हलविण्यात यावे अन्यथा याविरोधात वाडीपीरमधील ग्रामस्थ व दुग्ध व्यवसायिकांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares