Nagpur : पंचनामेच अंदाजपंचे…! नुकसानभरपाईबाबत सर्वकाही संशयास्पद, शेतकऱ्यांच्या काय आहेत भावना? – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
Aug 12, 2022 | 3:27 PM
नागपूर :  (Heavy Rain) अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे. उत्पन्नाच्या दृष्टीने (Kharif Season) खरीप हंगामाच महत्वाचा असतो पण यंदा पेरणी होताच सुरु झालेला पाऊस आता हंगाम मध्यावर असतानाही सुरुच आहे. विरोधकांचा रेटा आणि शेतकऱ्यांची परस्थिती पाहता राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र, मुळात पंचनामेच अंदाजपंचे केले जात आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई मिळणार तरी कशी असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बऱ्याच (Nagpur Farmer) शेतकऱ्यांना 408 एवढी तोकडी मदत दाखविण्यात आलीय.नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. सर्वकाही पाण्यात असतानाही अशी क्रुरचेष्टा का असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.
पंचनामे करण्याचे आदेश शासन स्थरावरुन देण्यात आले असले तरी स्थानिक पातळीवर कोणत्याही नियमांची अंमलबजावणी न होता अधिकारी-कर्मचारी हे अंदाजपंचेच पंचनामे करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर आपल्या पिकांचा पंचनामा झाला आहे का नाही हे देखील माहिती नाही. शिवाय अनेक ठिकाणी तर एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रात नुकसान झाले असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार मदत ही 400 ते 700 रुपयांपर्यंतच मिळणार आहे. त्यामुळे पंचनाम्यांमध्ये नियमितता यावी आणि जे नुकसान झाले तेच दाखवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ तर खुंटलीच पण शेतकऱ्यांनी जेवढा खर्च आतापर्यंत झाला आहे तेवढा देखील उत्पादनातून पदरी पडणार नाही. असे असताना शिंदे सरकारने मदत रकमेत दुपटीने वाढ केली असली तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पिकांची नोंदच केली जात नाही. त्यामुळे मदत रक्कम घोषित करुनही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात उपयोग काय असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. राज्य सरकारने हेक्टरी 13 हजार 600 रुपये अशा मदतीची घोषणा केली आहे, पण पंचनामे नियमिततेत होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

एका शेतकऱ्याचे एका हेक्टर पेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना 408, 544, 612 रुपये अशी मदत दाखवण्यात आली आहे. मुळात 1 हजार रुपयांपेक्षा कमी मदत करू नये असे सरकारचे आदेश आहे. मात्र, तरीही त्याखाली मदत दाखविण्यात आलीय. त्यामुळं ही म्हणजे आमची थट्टा आहे, मदत नको पण थट्टा करू नका, अशा भावना शेतकरी व्यक्त करताहेत.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares