Sant Muktai Palkhi : मुक्ताईनगरहून संत मुक्ताईच्या पालखीचं जयघोषात पंढरीकडे प्रस्थान – ABP Majha

Written by

By: चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा | Updated at : 03 Jun 2022 03:14 PM (IST)
Edited By: निलेश झालटे
Sant Muktai Palkhi Ashadhi Wari 2022 Pandharpur
Ashadhi Wari 2022 : वारकरी संप्रदायात महत्वाचे स्थान असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे जयघोषात मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे (Pandharpur Ashadhi wari news) प्रस्थान झाले. आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपूरसाठी सात संतांच्या मानाच्या पालख्या दाखल होत असतात. यातील स्त्री संत म्हणून संत मुक्ताई पालखीचं एक वेगळं महत्व आहे.
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या संत मुक्ताईच्या समाधी स्थळापासून या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं.  यावेळी सातशे किलोमीटर पायी प्रवास करीत हजारो वारकरी यामध्ये पंढरपूरकडे दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी होणार आहेत. 
आज पहाटेपासूनच पालखी प्रस्थान सोहळ्याची विधिवत जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी संत मुक्ताई समाधीस्थळी दाखल झाले होते.  यावेळी भजन कीर्तन जयघोषासह टाळकऱ्यांनी टाळांच्या गजरात विविध प्रात्यक्षिके दाखवत आपली सेवा बजावली आहे.
दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळ्यावर काही निर्बंध घालण्यात आले. मात्र तरीही मर्यादित वारकऱ्यांमध्ये ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली होती. तीन शतकाहून अधिक काळापासून संत मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आज पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.

पालखी सोहळ्याच्या पूजनप्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, मंदिर संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि वारकरी उपस्थित होते. टाळ मृदुंग आणि मुक्ताईच्या जयघोषात मोठया उत्साहात आणि भक्ती भावाने पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. 
संबंधित बातम्या :
Ashadhi Wari : यंदा आषाढीला पालखी सोहळ्यांसोबत 40 टक्के भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज 
Majha Impact : यंदाही आषाढी वारीत मानाच्या पालख्या रेल्वे रुळावरुन जाणार
Todays Headline 22nd September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Beed : कोल्हापूरच्या शहीद जवानाच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत, बचावकार्य दरम्यान बुडून झालेला मृत्यू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखे दिसणा-या विजय मानेची हायकोर्टात धाव, गुन्हा रद्द करण्याची मागणी
आ. बच्चू कडू यांना न्यायालयाचा दिलासा, मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणी जामीन मंजूर 
Maharashtra Breaking News Live 21 September 2022 : आता अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंना गटप्रमुखांची आठवण आली; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
Horoscope Today, September 22, 2022 : वृषभ, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांना होणार धनलाभ, गुरुवारचे राशीभविष्य वाचा
22 September In History : ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव, गुरु नानक यांचे निधन आणि आयस्क्रिम कोनचे पेटंट, इतिहासात या घटना घडल्या
Uddhav Thackeray speech : मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा ते बाप पळवणारी औलाद राज्यात; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे
Eknath Shinde : ‘अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली’, उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दिल्लीतून शिंदे यांचं उत्तर
Palghar : पालघरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाला मोठा धक्का, दोन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares