तातडीने व्यवस्था करण्याची मागणी: शेतकरी कामगार पक्षाचे तुळजापुरात आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शहरात स्वच्छता करण्यासह विविध भागात सार्वजनिक मुतारी बांधणे आदी विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नगरपालिके समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला विविध पक्षांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. शहरात स्वच्छता गृह तसेच मुताऱ्यांची संख्या नगण्य असल्याने भाविकांचे हाल होत आहेत. तरी तातडीने ही व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिवाय नगर पालिकेतील स्वच्छता व पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्ये वेतन अनेक महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांच्ये तातडीने वेतन करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्याचे निवेदन पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक यांनी स्विकारले.
यावेळी किरण खपले, उत्तम अमृतराव, विलास वेदपाठक, भालचंद्र जटाळ, युवराज पवार, अंगद सलगर, बाळासाहेब कुतवळ, खलील शेख, किरण घाटशिळे उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा तयार झाला. मात्र जाणूनबूजून टाळाटाळ करण्यात येत आहे. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व राजमाता जिजाऊसाहेबांचा पुतळा उभारण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचा वतीने करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares