पीकविम्याची रक्कम तातडीने मिळावी: बार्शीमध्ये शेतकरी रस्त्यावर, अन्यथा मंत्रालयात घुसण्याचा इशारा – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, या मागणीसाठी आज बार्शी तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले. नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन करत राहणार, असे यावेळी शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले.
अन्यथा मंत्रालयात घुसणार
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बार्शी- भूम मार्गावरील आगळगाव येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी गायकवाड म्हणाले, वारंवार शांततेच्या मार्गाने निवेदने देऊन व आंदोलने करुनसुद्धा शासन झोपलेलच आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. अन्यथा शेतकरी मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही.
लढाई सुरुच राहणार
अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यात पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा उन्मळून पडल्या. आंब्याच्या बागांची तीच अवस्था झाली. तूर, सोयाबीन पाण्यात गेले आहेत. कांदा नासून गेला आहे. टोमॅटोला भावच मिळाला नाही. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. शिवाय पिक विमा योजनेतून पैसे मिळवून देण्यात यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासन काहीच हालचाली करत नसल्याने आता रस्त्यावरची लढाई सुरू केल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.
नुकसान भरपाईवर शेट्टींचे मौन
आंदोलनात पोपट डमरे, शरद उकिरडे, दिगंबर विधाते आदी शेतकरी नेते सहभागी झाले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी साखर कारखाने आणि एफआरपी संदर्भात भाष्य केले. परंतु इतर पिकांच्या नुकसान भरपाईसंदर्भात काही बोलले नाहीत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी आता एकवटले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares