रास्तारोको आंदोलन: अकोट, तेल्हाऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करा; प्रहार चे रास्ता रोको – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
सध्याच्या युती सरकारमधील घटक पक्ष असलेला ‘प्रहार’ने आज अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात रस्ता रोको आंदोलन केलाय. जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज गुरुवारी ‘प्रहार’सह शेतकऱ्यांनी अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन केले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. अकोट आणि तेल्हारा हे दोन तालुके ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले. दरम्यान मागील काही दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक खरीप पिके, फळबागा, अनेक शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत.
मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी. अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट शहराध्यक्ष सागर त्र्यंबक उकंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या..
ओला दुष्काळ जाहीर करा, पिक विमा कापणी प्रयोग निकष न लावता सरसकट जाहीर करा, नियमीत कर्ज फेड करणारे शेतकरी यांचे प्रोत्साहनपर ५० हजार तात्काळ खात्यात जमा करा, सन २०२०-२१ चा बाकी असलेला सर्व शेतकऱ्यांचा ३५ टक्के खरीप विमा देण्यात यावा. (४८१ कोटी), फळबाग शेतकरी याचा सार्वत्रिक पिक विमा मंजूर करण्यात यावा. वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares