हलसवडे येथील जमिनीसाठी उपोषण – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
हलसवडेतील जमिनीसाठी उपोषणाचा इशारा
कोल्हापूर, ता. २२ : मौजे हसलवडे (ता. करवीर) येथील मागासवर्गीय शेतकरी कसत असलेली जमिनी बेकायदेशीररीत्या गौण खनिज उत्खननासाठी दिली आहे. एकीकडे एमआयडीची जमीन म्हणून याचा कब्जा दिला जात नाही. दुसरीकडे मात्र उत्खननासाठी दिली जात आहे. त्यामुळे शासनाने हा दुटप्पीपणा सोडून मागासवर्गीयांच्या कब्जात असणारी जमीन तत्काळ त्यांना द्यावी, नाहीतर सोमवारी (ता. २६) घटस्थापनेदिवशी सामूहिक उपोषण व आत्मदहन केले जाईल, असा इशारा मोहन कांबळे, रवींद्र कांबळे, पोपट पुजारी, अमोल कांबळे यांनी आज दिला.
जिल्हाधिकाऱ्यांचा बोगस आदेश तयार करून या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घातल्या जात आहेत. १९६१ पासून या जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करून द्याव्यात, या मागणीसाठी आंदोलन केली जात आहेत. ही जमीन एमआरडीसीची आहे, असे सांगून आम्हाला आमचा कब्जा देत नाहीत, तर दुसरीकडे विमानतळ विस्तारीकरणासाठी गौण खनिज उत्खननासाठी ही जमीन तत्काळ दिली जाते. त्यामुळे पूर्वी जो जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवून दिशाभूल केली जात होती. त्याची माहिती घेतली असता तो आदेशच बोगस आणि चुकीचा असल्याचे माहिती अधिकारात सांगण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचेही कांबळे यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares